मुंबई

निवडणूक ड्युटीनंतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुट्टी द्या! महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी

१६ जानेवारी रोजी निवडणूक ड्युटीवर असलेल्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुट्टी मंजूर करावी, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने केली आहे.

Swapnil S

मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सलग दीर्घ काळ काम करावे लागते. त्यामुळे त्यांना भरपाई स्वरूपात सुट्टी देण्यात यावी. तसेच १६ जानेवारी रोजी निवडणूक ड्युटीवर असलेल्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुट्टी मंजूर करावी, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने केली आहे.

निवडणूक ड्युटीमुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी १४ व १५ जानेवारी रोजी सुमारे ३० ते ३५ तास सलग काम करणार आहेत. १४ जानेवारी हा मकरसंक्रांत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना निवडणूक ड्युटी बजावावी लागत आहे. त्यामुळे सलग ड्युटी आणि सार्वजनिक सुट्टीत सेवा बजावल्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणारा शारीरिक व मानसिक ताण लक्षात घेऊन विश्रांतीसाठी सुट्टी देणे अत्यावश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

सुट्टी देणे हे प्रशासनाचे कर्तव्य

निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीची गरज आहे, मात्र त्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्टीत आणि सलग ३० ते ३५ तास काम करण्यास भाग पाडणे योग्य नाही. मकरसंक्रांतसारख्या सणाच्या दिवशीही कर्मचाऱ्यांना निवडणूक ड्युटी करावी लागत असेल, तर त्याची भरपाई स्वरूपात सुट्टी देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. १६ जानेवारीला सर्व निवडणूक ड्युटीवर नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुट्टी देणे ही मानवी आणि न्याय्य बाब असल्याचे महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष तानाजी कांबळे यांनी सांगितले.

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही, यासाठी संघटना सर्व पातळीवर आवाज उठवेल आणि यासाठी पाठपुरावा करेल, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

Jantar Mantar Assault Case : स्वतंत्र भारद्वाज अटकेत; न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी

Mumbai Dahi Handi 2026 : मालाडमध्ये विटांचा खांब कोसळला; ७ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Dahi Handi 2026 : दहीहंडीच्या उत्साहाला अपघातांचं गालबोट; २२ गोविंदा जखमी

नळदुर्ग किल्ल्यावरून महिला कुस्तीपटूची तीन मुलांसह उडी; सासरच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, चौघांवर गुन्हा दाखल