मुंबई

मधुकर नेराळे यांचे निधन

महाराष्ट्रातील तमाशासह लोक कलेचा आधारवड आणि लोककलेत आपली भिष्मचार्य‌ म्हणून प्रतिमा उमटवून असणारे मधुकर नेराळे यांचे मुंबईत सोमवारी हृदयविकाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले आहेत.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रातील तमाशासह लोक कलेचा आधारवड आणि लोककलेत आपली भिष्मचार्य‌ म्हणून प्रतिमा उमटवून असणारे मधुकर नेराळे यांचे मुंबईत सोमवारी हृदयविकाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले आहेत.

नेराळे यांनी आयुष्यभर लोक कलेच्या अस्तित्वासाठी स्वतःला वाहून घेतले. वडिलोपार्जित गिरणगावातील न्यू हनुमान थिएटरमध्ये १९६० पर्यंत पारंपरिक तमाशा कलेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. रोशन सातारकर, यमुनाबाई वाईकर, लिला गांधी ते अगदी मधु कांबीरकर यांच्यापर्यंत असंख्य कलावंताना 'न्यू हनुमान थिएटर' हे आधारवड ठरले.

त्यांनी १९६९ च्या सुमारास स्वतःची यशराज लोक नाट्य संस्था स्थापन करून, वगसम्राट, गाढवाचे लग्न, आतून कीर्तन बाहेरून तमाशा, राजकारण गेले चूलीत, उदं गं आंबे उदं, पुनवेची रात्र काजळी अशी एका पेक्षा एक संगीत लोकनाट्य कला रसिकांपुढे आणून कलावंतांमध्ये‌ नवा आत्मविश्वास रुजविला.

'वर्ककेशन'मध्ये मुंबईचा ग्लोबल डंका; 'वर्क फ्रॉम एनिवेअर'मुळे उत्पादकतेत ८० टक्के वाढ; कामासोबत पर्यटनासाठी मुंबईला जागतिक पसंती

Pune : दोन महिला पोलिस करणार होत्या समलैंगिक विवाह; आळंदीत लग्नाची तयारी, पत्रिकाही छापल्या, पण आता विवाह रद्द

माहुलमध्ये तीन मजली अत्याधुनिक अग्निशमन केंद्र; आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळणार; अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था

केशव सृष्टी सहल वादाच्या भोवऱ्यात! सपानंतर काँग्रेसचाही विरोध

तुर्भेमधील गोदामातील जप्ती हायकोर्टाने ठरवली बेकायदेशीर; नवी मुंबई पोलिसांना झटका