Mumbai : डॉ. अश्विनी जोशी, प्राजक्ता वर्मा यांच्या बदलीला स्थगिती 
मुंबई

Mumbai : डॉ. अश्विनी जोशी, प्राजक्ता वर्मा यांच्या बदलीला स्थगिती

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी आणि नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्राजक्ता वर्मा यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे.सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी बदलीच्या आदेशाला स्थगिती देणारे आदेश काढले.सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी आणि नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्राजक्ता वर्मा यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे.सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी बदलीच्या आदेशाला स्थगिती देणारे आदेश काढले.सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते.

बदल्यांच्या यादीत डॉ. जोशी आणि वर्मा यांचा समावेश होता. डॉ. जोशी यांची बदली कमी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी करण्यात आली होती. तर डॉ. जोशी यांच्या जागी प्राजक्ता वर्मा यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला होता.

भाजपा नेत्याच्या विनंतीवरून स्थगिती

विशेष म्हणजे २००६ च्या तुकडीतील सनदी अधिकारी असलेल्या डॉ. अश्विनी जोशी या भाजपमधील एका नेत्याच्या निकटवर्ती मानल्या जातात. या नेत्याच्या विनंतीवरून सरकारने रातोरात डॉ. अश्विनी जोशी यांच्या बदलीला स्थगिती दिल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, डॉ. जोशी यांच्या बदलीला देण्यात आलेली स्थगिती ही तांत्रिक कारणांसाठी आहे. सध्या सुरु असलेल्या एसआयआर प्रक्रियेसाठी डॉ. जोशी या प्राधिकृत अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीला निवडणूक आयोगाकडून मान्यता घेण्यात येणार आहे. ही मान्यता मिळताच डॉ. जोशी यांच्या बदलीवरील स्थगिती उठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. डॉ. जोशी यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आल्याने प्राजक्ता वर्मा यांना पुन्हा नियुक्तीच्या प्रतीक्षेत राहावे लागणार आहे.

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

गुजरातमध्ये सैराट, २३ सेकंदांत १३ वार! प्रेमविवाहाच्या ७ वर्षांनंतर भावाने बहिणीचं पुसलं कुंकू

Gwalior Accident : नवरात्रीत शीतला माता मंदिराबाहेर भीषण दुर्घटना! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडलं; १४ जणांचा मृत्यू