वैद्यकीय प्रवेश निकालाचा घोळ न्यायालयात; सरकारला भूमिका मांडण्याचे निर्देश; सुनावणी आता १३ नोव्हेंबरला 
मुंबई

वैद्यकीय प्रवेश निकालाचा घोळ न्यायालयात; सरकारला भूमिका मांडण्याचे निर्देश; सुनावणी आता १३ नोव्हेंबरला

वैद्यकीय प्रवेशाच्या गट ब अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या फेरीच्या निकालांची घोषणा २०२५-२६ शैक्षणिक वर्षाच्या वैद्यकीय प्रवेशाच्या गट अ अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या फेरीच्या निकालांपूर्वीच करण्यात आली आहे. याला आक्षेप घेण्यात दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली.

Swapnil S

मुंबई : वैद्यकीय प्रवेशाच्या गट ब अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या फेरीच्या निकालांची घोषणा २०२५-२६ शैक्षणिक वर्षाच्या वैद्यकीय प्रवेशाच्या गट अ अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या फेरीच्या निकालांपूर्वीच करण्यात आली आहे. याला आक्षेप घेण्यात दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन डी. भोबे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला भूमिका मांडण्याचे निर्देश देत याचिकेची पुढील सुनावणी १३ नोव्हेंबरला निश्चित केली.

वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छिणारी पुण्यातील विद्यार्थिनी पूर्वा वाघ हिने यासंदर्भात उच्च न्यायालयात दाद मागत याचिका दाखल केली. वैद्यकीय प्रवेश अभ्यासक्रमांच्या निकालाच्या घोषणेत मोठा घोळ घालण्यात आला असून त्याचा फटक बसून मला वैद्यकीय प्रवेशाची संधी गमावावी लागली आहे, असा दावा याचिकाकर्त्या विद्यार्थिनीने केला आहे. याचिकेवर न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. अश्विन डी. भोबे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. राहुल कामेरकर यांनी वाघ हिला गट अ अभ्यासक्रमांच्या निकालात प्रवेश मिळाला आहे.

तथापि, गट अ अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या फेरीचा निकाल गट अ निकालापूर्वी जाहीर करण्यात आल्याने पुढील फेरीत सहभागी होण्यास मनाई केली गेली आहे याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.

न्यायालयाने याचिकेची दखल घेत राज्य सरकारला भूमिका मांडण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी १३ नोव्हेंबरला निश्चित केली.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, "अत्यंत धक्कादायक, मुलांमध्ये सूडबुद्धी का तयार होते?"

खर्चात मोठी वाढ; मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये ५.४ लाख कोटींची भर

मुंबई-गोवा महामार्गाला ग्रामस्थांकडून हिरवाईची भेट; तळेकांटे ग्रामस्थ लावणार दोन हजार झाडे

आषाढी वारीसाठी लालपरी सज्ज; ठाणे विभागाकडून पंढरपूरसाठी १६ जादा एसटी फेऱ्यांचे नियोजन

‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा टीझर प्रदर्शित; अंकुश, कुशल, अभिजीत आणि संतोषच्या गँगचा चित्रपटगृहात होणार तुफान राडा