(प्रातिनिधिक छायाचित्र) 
मुंबई

शाळेच्या नावांमधून ग्लोबल, इंटरनॅशनल काढा; राज्य मंडळाच्या अखत्यारीतील शाळांना शिक्षण संचालनालयाचे निर्देश

ग्लोबल, इंटरनॅशनल, सीबीएसई अशा शब्दांचा वापर करून राज्य मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या शाळा पालकांची दिशाभूल करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालकांची फसवणूक थांबविण्यासाठी शिक्षण संचालनालयाने शाळांच्या नावांमधून असे शब्द वगळण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबतचे पत्रक संचालनालयाने नुकतेच जारी केले आहे.

Swapnil S

मुंबई : ग्लोबल, इंटरनॅशनल, सीबीएसई अशा शब्दांचा वापर करून राज्य मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या शाळा पालकांची दिशाभूल करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालकांची फसवणूक थांबविण्यासाठी शिक्षण संचालनालयाने शाळांच्या नावांमधून असे शब्द वगळण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबतचे पत्रक संचालनालयाने नुकतेच जारी केले आहे.

राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळाही आपल्या नावापुढे 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल', 'सीबीएसई' किंवा 'इंग्लिश मिडियम' अशा शब्दांचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शाळा आंतरराष्ट्रीय किंवा केंद्रीय मंडळाशी संलग्न असल्याचे पालकांना वाटते. यामाध्यमातून पालकांच्या फसवणुकीचा धोका वाढत असल्याचे शिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण

मंडळाच्या अधिकृत शाळांसाठी 'सीबीएसई' शब्द वापरता येतो. मात्र राज्य मंडळाच्या शाळांनी सीबीएसई शब्द नावात वापरणे अनुचित असल्याचेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे. तसेच, 'इंटरनॅशनल' किंवा 'ग्लोबल' असे शब्द वापरण्यासाठी संबंधित शाळेची परदेशातील शाखा किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिकृत संलग्नता असणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले आहे.

त्याचप्रमाणे नवीन मान्यता तसेच दर्जावाढीचे प्रस्ताव सादर करणाऱ्या शाळांच्या नावांची तपासणी करण्याचे निर्देशही संचालनालयाने दिले आहेत. पालक, विद्यार्थी आणि समाजाची दिशाभूल होईल अशी नावे असल्यास ती तात्काळ बदलण्याबाबत संबंधित शाळा व्यवस्थापनांना सूचित करण्यात येणार आहे. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांच्या नावांमध्येही असे शब्द आढळल्यास त्यावर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

रेस्टॉरंटमध्ये खराब जेवण मिळालं? FSSAI कडे काही मिनिटांत करा तक्रार; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

Mumbai : पायधुणीत ८ वर्षीय चिमुकलीवर सुरक्षारक्षकाकडून लैंगिक अत्याचार, संतप्त नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी

Thane : दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला वाढदिवसाचा बॅनर; Video व्हायरल

Pune : जेजुरी दुर्घटनेतील मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर; राज्य सरकारची घोषणा

Mumbai : एसी लोकलमध्ये प्रवाशांचा गुदमरला जीव; तांत्रिक बिघाडामुळे १५ मिनिटे मुलुंड स्थानकात खोळंबा, Video