आदिती तटकरे संग्रहित छायाचित्र
मुंबई

महिला आणि बालविकास विभागात महाभरती; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती; एकूण ८,६६९ पदे भरणार

राज्यातील महिला तसेच बालकांसाठीच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी महिला आणि बालविकास विभागात लवकरच ८ हजार ६६९ पदे भरण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शनिवारी दिली.

Swapnil S

मुंबई : राज्यातील महिला तसेच बालकांसाठीच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी महिला आणि बालविकास विभागात लवकरच ८ हजार ६६९ पदे भरण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शनिवारी दिली. याशिवाय २ हजार ८४३ बाह्यस्त्रोत पदे तसेच अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रत्येकी १ लाख १० हजार ६६४ मानधनावरील पदांना मान्यता दिली आल्याचे तटकरे यांनी सांगितले.

महिला आणि बालविकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध ११ मार्च २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला होता. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याची माहिती तटकरे यांनी शनिवारी 'एक्स' या समाज माध्यमातून दिली. सन २००३ नंतर म्हणजेच तब्बल २३ वर्षांनंतर विभागाच्या रचनेत हा मोठा बदल करण्यात आला असून, या ऐतिहासिक निर्णयामुळे विभागाच्या कामकाजास मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

बदलत्या गरजा लक्षात घेता उच्चस्तरीय समितीने प्रस्तावित केलेल्या १६५ नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच विभागातील एकूण पदांचा आढावा घेताना काही पदे रद्द करण्यात आली आहेत. विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांतील गट-अ ते गट-ड मधील एकूण ८ हजार ६६९ नियमित पदांना मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र समाज कल्याण मंडळ मुंबई येथील १५ कार्यरत आणि ३२ प्रतिनियुक्तीवरील आता आयुक्त, महिला आणि बाल कर्मचाऱ्यांचे विकास, पुणे यांच्या अधिनस्त रिक्त पदांवर समकक्ष वेतनात समायोजन केले जाणार आहे, अशी माहितीही तटकरे यांनी दिली आहे.

२३ वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

सन २००३ पासून प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लागल्यामुळे विभागाच्या कामकाजाला अधिक चालना मिळणार आहे. तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील महिला, बालकांसाठीच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल.
आदिती तटकरे

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Navi Mumbai : महापालिका पदभरती निकालाचा मार्ग मोकळा; संवर्गाचे स्कोअर कार्ड संकेतस्थळावर होणार जाहीर

Thane : खारफुटीतील भराव तात्काळ थांबवा! पोलीस आयुक्तांना NGT चा दणका, जिल्हाधिकाऱ्यांनाही फटकारले

Ulhasnagar : 'मी आमदार आहे, नगरसेवकाला विचारण्याची गरज नाही'; गोलमैदानातील विकासकामावरून आयलानी-पांडे आमनेसामने

Thane : गणेशोत्सवात अवजड वाहनांना 'नो एंट्री' विसर्जनाच्या पाच दिवसांत शहरात प्रवेशबंदी