अखेर मिठागराची जागा मिळाली; गांधी मार्केट, चेंबूर, नेहरू नगर होणार पूरमुक्त, १४ वर्षांनंतर माहुल पंपिंग स्टेशनचा मार्ग मोकळा  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

अखेर मिठागराची जागा मिळाली; गांधी मार्केट, चेंबूर, नेहरू नगर होणार पूरमुक्त, १४ वर्षांनंतर माहुल पंपिंग स्टेशनचा मार्ग मोकळा 

माहुल पंपिंग स्टेशनसाठी मिठागराची ६.१७६ एकर जागा देण्यास केंद्र सरकारच्या सॉल्ट कमिशनने अखेर हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे १४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रखडलेल्या माहुल पंपिंग स्टेशनचा मार्ग मोकळा झाला आहे.

Swapnil S

मुंबई : माहुल पंपिंग स्टेशनसाठी मिठागराची ६.१७६ एकर जागा देण्यास केंद्र सरकारच्या सॉल्ट कमिशनने अखेर हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे १४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रखडलेल्या माहुल पंपिंग स्टेशनचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे पावसाळ्यात कुर्ला, शीव, चेंबूर आदी भाग पाण्याखाली जाण्याचे प्रकार आता थांबतील, अशी आशा निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे अतिशय कमी मोबदल्यात ही जमीन पालिकेला मिळाली आहे. या जमिनीसाठी १५० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी केंद्र सरकारशी चर्चा करून फक्त १५ कोटी रुपयांत ही जमीन पालिकेच्या ताब्यात घेतली आहे. माहुल पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर गांधी मार्केट चेंबूर, सिंधी सोसायटी, नेहरु नगर, माटुंगा, कुर्ल्यासह सायन रेल्वे स्थानक लवकरच पूरमुक्त होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात सखल भागात पाणी जमा होते आणि मुंबई ठप्प होते. मुंबई पूरमुक्तीसाठी मुंबई महापालिका प्रशासनाने २००६ मध्ये ब्रिमस्ट्रोवॅड सह अनेक प्रकल्प राबवत आहे. हाजी अली, रे रोड, वरळी लव्हग्रो, क्लिव्हलँड, जुहू इर्ला आणि खार येथील गझदरबंद या ठिकाणी सहा पंपिंग स्टेशन उभारली आहेत. तसेच गांधी मार्केट, चेंबूर, सिंधी सोसायटी, नेहरु नगर, माटुंगा कुर्ल्यासह सायन रेल्वे स्थानक पूरमुक्तीसाठी माहुल पंपिंग स्टेशन उभारणे गरजेचे आहे. यासाठी पर्जन्य जलवाहिनी विभागाने  माहुल पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी केंद्र सरकारच्या सॉल्ट कमिशनर खात्याकडे जागा मिळवण्याकरिता पाठपुरावा करीत होते. अखेर १४ वर्षांनंतर केंद्र सरकारने मिठागरची जागा देण्यास होकार दिला आहे.

पंपिंग स्टेशनचा ‘हा’ होणार लाभ

माहुल पंपिंग स्टेशनसाठी पालिकेला १५५०० चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे, तर सॉल्ट कमिशनकडून मिठागराची ६.१७६ एकर जागा मिळणार आहे. ‘एमबीपीटी’ रोडच्या बाजूने माहुल खाडी, वडाळा येथे माहुल नाल्याजवळ हे पंपिंग स्टेशन उभारले जाणार आहे. नाला, खाडी जवळ असल्याने अतिवृष्टीत या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी उपसून बाहेर फेकणे सोयीस्कर ठरणार आहे.

ऑफिसमध्ये WhatsApp Web वापरताय? लॉगआउट न करताच निघू नका; गृह मंत्रालयाचा इशारा, वाचा सविस्तर

Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; २०१८ च्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

Solapur : बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रात्रभर बचावकार्य सुरू, पण प्रयत्न अपयशी, पंढरपुरात हळहळ

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्यावर FSSAI ची कारवाई; कंपनीचं स्पष्टीकरण समोर, नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhajinagar : प्रवासी झोपेत असतानाच खासगी बसची पुलाच्या कठड्याला जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, २७ जखमी