मुंबई

२५ लाखांच्या चोरीप्रकरणी मोलकरणीला अटक

या गुन्ह्यांत इतर दोन नोकरांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हताी घेतली आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबई : सुमारे २५ लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी अर्चना सुनील काशीकर या पळून गेलेल्या मोलकरणीला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. चोरीच्या याच गुन्ह्यांत तिला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर दोन नोकरांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ४८ वर्षांच्या तक्रारदार महिलेची मीडिया कंपनी असून त्यांच्याकडे धोंडाबाई काशिकर या गेल्या ३० वर्षांपासून कामाला होत्या. सहा वर्षांपासून तिची सून अर्चना ही तिच्याकडे कामाला होती. ऑक्टोबरला महिन्यांत घराच्या कपाटातून २५ लाख ३५ हजार रुपयांचे विविध सोन्याचे दागिने आणि सहा लाखांची कॅश चोरी झाल्याचे दिसून आले. ही चोरी अर्चना केल्याचा तिला संशय होता. त्यामुळे तिने अर्चनाविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. अर्चनाच्या चौकशीत तिने तिच्या इतर सहकारी नोकरासोबत ही चोरी केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत इतर दोन नोकरांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हताी घेतली आहे.

राज्यातील डॉक्टर आज संपावर; होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीचा सराव करण्याच्या परवानगीला विरोध

प्रतीक्षा संपणार! नवी मुंबई विमानतळावरून ३० सप्टेंबरला पहिले उड्डाण ? PM मोदींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता

Mumbai : कुलाबा ते आरे थेट प्रवास; मेट्रो-३ ची संपूर्ण मार्गिका ३० सप्टेंबरपासून सेवेत; PM मोदी करणार उद्घाटन

आपत्कालीन वैद्यकीय सेवा विस्तारात अपयश; मध्य रेल्वेच्या चार स्थानकातच आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उपलब्ध

Nashik : कालिका माता मंदिर २४ तास खुले राहणार; भाविकांसाठी व्यापक सुविधा उपलब्ध