मुंबई

बॅनर लावण्याच्या वादातून महिलेच्या लगावली कानशिलात ; मनसे पदाधिकाऱ्याचे नाव समोर

वृत्तसंस्था

मुंबादेवी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून एका महिलेला मारहाण करण्यात आली आहे. मनसेच्या वतीने गणेशोत्सव बॅनर लावताना वाद झाल्याची ही प्राथमिक माहिती समोर येत आहे. पीडित प्रकाश देवी यांच्या मेडिकल समोर मनसे कार्यकर्ते खांब उभारून बॅनर लावत होते. सदर महिलेने यासाठी प्रतिकार केला असता तिला मारहाण करण्यात आली. तसेच यावेळी महिलेला शिवीगाळ करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे.


प्रकाश देवी यांचे मुंबादेवी परिसरात मेडिकल आहे. त्यासमोर गणेशोत्सवाच्या बॅनरसाठी खांब लावण्यात येत होते. मनसे पदाधिकारी विनोद अरगिले आणि इतर सहकारी यावेळेस उपस्थित होते. प्रकाश देवी यांच्या मेडिकल समोर बॅनर लावण्यात येत असताना पीडितेने या गोष्टीस विरोध करण्यास सुरुवात केली. तसेच लावण्यात आलेले खांब काढण्याची मागणी केली. त्यावरून वाद वाढला. यानंतर मनसे पदाधिकार्यांने महिलेच्या कानशिलात लगावली. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे असे समजते की, यामध्ये महिला दोनदा खाली पडली. मनसेचे मुंबादेवीचे पदाधिकारी विनोद अरगिले यांनी पीडितेला कानशिलात मारल्याचे चित्र आहे. वाद सुरु झाल्यानंतर काही लोकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर मोठी गर्दी झाली व परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

ऑस्ट्रेलियाची दोन भारतीय हेरांवर कारवाई

'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे रिंकूने स्थान गमावले; बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचा संघ निवडीबाबत गौप्यस्फोट

Video: देशातील पहिली Vande Bharat Metro तयार, 'या' मार्गांवर सुरु होणार सेवा

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम