एक्स @ShelarAshish
मुंबई

कान्समध्ये मराठी चित्रपटांचा डंका; ‘स्थळ, ‘जुनं फर्निचर’सह चार चित्रपटांची निवड

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्यावतीने फ्रान्समधील कान्स या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’ आणि ‘खालिद का शिवाजी’ या मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्यावतीने फ्रान्समधील कान्स या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’ आणि ‘खालिद का शिवाजी’ या मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची विशेष निवड करण्यात आल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी रविवारी केली.

दादर येथील पत्रकार परिषदेत शेलार म्हणाले की, “महाराष्ट्र चित्रपट, नाट्य आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या टीमने या चित्रपटांचे परीक्षण केले आहे. ‘स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’ आणि ‘खालिद का शिवाजी’ यांची अधिकृतपणे निवड झाली आहे, तर ‘जुनं फर्निचर’ला विशेष स्क्रीनिंग स्लॉट मिळाला आहे, ही अभिमानाची बाब आहे. २०१६ पासून, महामंडळ मराठी चित्रपटांना जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांशी जोडण्यासाठी कान्स चित्रपट महोत्सवात पाठवत आहे.” परीक्षण मंडळात आदित्य सरपोतदार, निखिल महाजन, गणेश मतकरी, इरावती कर्णिक, अपूर्वा शालिग्राम यांचा समावेश होता.

राज मोरे यांच्या ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटात खालिद हा मुलगा मुस्लिमधर्मीय असल्याने त्याला इतर मुले एकटे पाडतात. त्याचे निरागस डोळे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध घेतात, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. महेश मांजरेकर अभिनीत आणि दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्त्वावर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात वृद्धापकाळात पोहोचल्यावर आपलीच मुले आपल्याला कशाप्रकारे नाकारतात आणि त्यामुळे होणारे हाल दाखवण्यात आले आहेत.

१४ ते २२ मे दरम्यान कान्स चित्रपट महोत्सव

फ्रान्समध्ये येत्या १४ ते २२ मे या कालावधीत कान्स चित्रपट महोत्सव संपन्न होणार आहे. भारतातील ग्रामीण भागातील पारंपारिक अरेंज मॅरेज व्यवस्थेवर भाष्य करणारा ‘स्थळ’ हा चित्रपट आहे. समाजात खोलवर रूजलेली पितृसत्ताक पद्धत, रंगभेद आणि सामाजिक दृष्टिकोन अशा अनेक गोष्टींवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘स्नो फ्लॉवर’ हा मराठी चित्रपट मार्मिक, क्रॉसकंट्री कथा सांगणारा आहे. रशिया आणि कोकण या दोन वेगळ्या संस्कृतींना जोडणारा तसेच बर्फाळ सायबेरिया आणि हिरवेगार कोकण यांच्या विरोधाभासी पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट आहे. गजेंद्र अहिरे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

रोहित पवारांनी अजित पवारांच्या भूमिकेचं केलं स्वागत, पण फडणवीसांवर टीका; म्हणाले - "एकीकडं ठेकेदारांचं बिऱ्हाड..."

मुंबई-पुणे सोडून थेट बहरीन! जय पवार-ऋतुजा पाटील यांचं शाही लग्न; ‘डेस्टिनेशन वेडिंग’साठी ४०० पाहुण्यांमध्ये NCP चे केवळ २ नेते

"आता कोण गप्प आहे?" रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीनंतर विरोधकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबईतील हॉटेल्स, बार, बेकऱ्या FDA च्या रडारवर; ख्रिसमस-नववर्षाच्या तोंडावर तपासणी मोहीम

Mumbai : 'कूपर'मध्ये बेडवरून रुग्ण पडण्याच्या घटनांत वाढ; नातेवाईकांकडून सुरक्षेची मागणी