मुंबई

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या नियमाला हायकोर्टात आव्हान; वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्याकडून याचिका दाखल

वैद्यकीय प्रवेशाशी संबंधित केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या तीन फेरीत जागा मिळवणाऱ्या उमेदवारांना रिक्त जागा भरण्याच्या फेरीत सहभागी होण्यास मनाई करणाऱ्या नियमाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : वैद्यकीय प्रवेशाशी संबंधित केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या तीन फेरीत जागा मिळवणाऱ्या उमेदवारांना रिक्त जागा भरण्याच्या फेरीत सहभागी होण्यास मनाई करणाऱ्या नियमाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. वैद्यकीय शाखेच्या एका विद्यार्थ्याने यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन भोबे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित करत याचिकाकर्त्या विद्यार्थ्याला याचिकेची व्याप्ती वाढवण्यास परवानगी दिली.

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील निर्बंधामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयांमध्ये अपग्रेड होण्यापासून रोखले जात आहे, तर कमी गुण मिळवणारे उमेदवार उच्च संस्थांमध्ये नव्याने उघडलेल्या रिक्त जागांसाठी पात्र ठरत आहेत, याकडे याचिकेद्वारे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले आहे. याचिकाकर्त्या विद्यार्थ्याने अतिरिक्त कॅप फेरी आणि तिसऱ्या फेरीचे पुनर्वाटप करण्याची मागणी याचिकेतून केली आहे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला याचिकेची व्याप्ती वाढविण्याची परवानगी दिली.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन