म्हाडाच्या समूह पुनर्विकास प्रकल्पांच्या निविदा खुल्या; दोन वसाहतींचा पुनर्विकास करणार अदानी प्रॉपर्टीज 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : म्हाडाच्या समूह पुनर्विकास प्रकल्पांच्या निविदा खुल्या; दोन वसाहतींचा पुनर्विकास करणार अदानी प्रॉपर्टीज

म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत आदर्श नगर-वरळी, वांद्रे रेक्लेमेशन आणि एस.व्ही.पी. नगर, अंधेरी (पश्चिम) येथील समूह पुनर्विकास प्रकल्पांसाठी बांधकाम व विकास संस्था नियुक्त करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदांच्या वित्तीय निविदा नुकत्याच उघडण्यात आल्या आहेत. यामधील आदर्श नगर-वरळी प्रकल्पासाठी मे. अदानी प्रॉपर्टीज प्रा. लि. हे उच्चतम निविदाकार आहेत.

Swapnil S

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत आदर्श नगर-वरळी, वांद्रे रेक्लेमेशन आणि एस.व्ही.पी. नगर, अंधेरी (पश्चिम) येथील समूह पुनर्विकास प्रकल्पांसाठी बांधकाम व विकास संस्था नियुक्त करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदांच्या वित्तीय निविदा नुकत्याच उघडण्यात आल्या आहेत. यामधील आदर्श नगर-वरळी प्रकल्पासाठी मे. अदानी प्रॉपर्टीज प्रा. लि. हे उच्चतम निविदाकार आहेत.

वांद्रे रेक्लेमेशन प्रकल्पाकरिता मे. अदानी प्रॉपर्टीज प्रा. लि. हे उच्चतम निविदाकार आहेत. एस. व्ही. पी. नगर, अंधेरी (पश्चिम) प्रकल्पासाठी मे. हनुरा रियलटी प्रा. लि., मे. चांडक रियलटर्स प्रा. लि., मे. प्रेमसागर इन्फ्रा रियलटी प्रा. लि., मे. वॅनटियर रियलटी प्रा. लि. यांचा समूह हे उच्चतम निविदाकार आहेत. मे. हनुरा रियलटी प्रा. लि. ही मे. जे.एस.डबल्यु. स्टील लि. यांची उपकंपनी आहे.

तिन्ही प्रकल्पांसाठी उच्चतम निविदाकारांच्या निविदा स्वीकृतीचा प्रस्ताव सदर प्रकल्पाकरिता गठित करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीसमोर सादर करण्याचे प्रस्तावित आहे. सदर प्रस्तावास उच्चाधिकार समितीची मान्यता प्राप्त झाली.

वीजचोरांवर AI चा 'सर्जिकल स्ट्राईक'; तीन महिन्यांत २८ हजार वीजचोरीचा पर्दाफाश, २८९ प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल

Mira-Bhayandar : उत्तन-पाली डम्पिंगला हरित लवादाचा दणका; तीन महिन्यांत ९.०९ लाख मेट्रिक टन कचरा हटवा

नांदेड-भोकर महामार्गावर भीषण अपघात; सहा ठार, दहा जण जखमी; भोकर व नांदेड येथे उपचार सुरू

Sindhudurg : पक्षाच्या प्रतिमेला ‘गालबोट’ लावणाऱ्यांची गय नाही! नितेश राणेंचा कार्यकर्त्यांना इशारा

Thane : रखडलेले SRA प्रकल्प आता रडारवर; अकार्यक्षम विकासकांना हटविण्याचे संकेत