मुंबई

Mira Bhayandar: लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार; भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्यावर गुन्हा दाखल

मीरा-भाईंदर परिसरातील मीरारोड पूर्व येथील प्रभाग क्र. १२ मधील भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध एका ४० वर्षीय महिलेने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली असून...

Swapnil S

भाईंंदर : मीरा-भाईंदर परिसरातील मीरारोड पूर्व येथील प्रभाग क्र. १२ मधील भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध एका ४० वर्षीय महिलेने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली असून मीरारोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारीनुसार, जुलै २०२२ पासून आरोपीने महिलेची ओळख वाढवून तिला लग्नाचे आश्वासन दिले. त्यानंतर विविध ठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप आहे. मीरारोड येथील कार्यालयात तसेच इतर ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचे महिलेने नमूद केले आहे. तसेच तक्रार दिल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, सुरुवातीला गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला होता. अखेर उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडित महिलेविरुद्धही खंडणीचा गुन्हा

या प्रकरणात आणखी एक वळण आले असून, आरोपीच्या तक्रारीवरून नवघर पोलीस ठाणे येथे संबंधित महिलेविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ऑफिसमध्ये WhatsApp Web वापरताय? लॉगआउट न करताच निघू नका; गृह मंत्रालयाचा इशारा, वाचा सविस्तर

Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; २०१८ च्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

Solapur : बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रात्रभर बचावकार्य सुरू, पण प्रयत्न अपयशी, पंढरपुरात हळहळ

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्यावर FSSAI ची कारवाई; कंपनीचं स्पष्टीकरण समोर, नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhajinagar : प्रवासी झोपेत असतानाच खासगी बसची पुलाच्या कठड्याला जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, २७ जखमी