भाईंदरमध्ये ४.६४ लाख मतदार यादीतून 'गायब'; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

भाईंदरमध्ये ४.६४ लाख मतदार यादीतून 'गायब'; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत तब्बल ४ लाख ६४ हजार १७२ मतदार प्रत्यक्ष पडताळणीत आढळून आलेले नाहीत.

Swapnil S

भाईदर : मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत तब्बल ४ लाख ६४ हजार १७२ मतदार प्रत्यक्ष पडताळणीत आढळून आलेले नाहीत. दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील एकूण मतदारांपैकी तब्बल ४२.८६ टक्के मतदार पडताळणीत न सापडल्याने मतदार याद्यांच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आकडेवारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राज्य निवडणूक आयोग आणि मुख्य जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका कर्मचारी, शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत ही मोहीम राबविण्यात आली. मीरा-भाईंदर आणि ओवळा-माजिवडा या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार प्रत्यक्ष पडताळणीत आढळून आलेले नाहीत.

बीएलओंनी केलेल्या क्षेत्रीय पाहणी आणि पंचनाम्यांमध्ये अनेक मतदार परराज्यात किंवा इतर शहरांत स्थलांतरित झाल्याचे आढळून आले आहे. काही मतदार दिलेल्या पत्त्यावर वास्तव्यास नसल्याचेही समोर आले. याशिवाय मतदार यादीत दुबार नोंदणीची प्रकरणे तसेच मयत व्यक्तींची नावे अद्याप कायम असल्याचे निदर्शनास आले आहे.

मतदारसंघनिहाय आकडेवारी

१४५ - मीरा-भाईंदर

एकूण : ५,१४,९५०

पडताळणीत आढळले नाहीत : २,१३,१८७

प्रमाण : ४१.४०%

१४६ - ओवळा-माजिवडा

एकूण मतदार : ५,६७,९७२

पडताळणीत आढळले नाहीत : २,५०,९८५

प्रमाण : ४४.१९% दोन्ही मतदारसंघ

एकूण मतदार : १०,८२,९२२

पडताळणीत आढळले नाहीत : ४,६४, १७२

प्रमाण : ४२.८६%

काही भागांतील तफावत

शहरातील बहुतांश भागांत पडताळणीत आढळून न आलेल्या मतदारांचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक असताना नयानगर आणि उत्तन परिसरात हे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. या तफावतीमुळे आगामी निवडणुकांतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मीरा-भाईंदर महापालिकेचे माजी नगरसेवक तथा नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील उमेदवार रोहित सुवर्णा यांचे नावही मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून स्थानिक मतदार असूनही नाव गायब झाल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मॅरेथॉनमुळे ठाण्यात वाहतूक बदल; प्रमुख मार्गांवर प्रवेशबंदी, अनेक ठिकाणी 'नो पार्किंग'

पॅकबंद अन्नावर आता षटकोनी लाल इशारा

कशेडी घाटाच्या बोगद्यात गळती सुरूच; उपाययोजना कागदावरच, गणेशभक्तांवर चिंतेचे सावट

एव्हरेस्ट, लालजीच्या हिंग पावडरवर बंदी

मुरली मनोहर जोशी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; सरकार स्वतःच घोटाळ्यांमध्ये अडकल्याची टीका