मीरा-भाईंदरमध्ये 'झोंबी ड्रग्ज'चा शिरकाव? VIDEO व्हायरल, पोलीस सतर्क  
मुंबई

Mumbai : मीरा-भाईंदरमध्ये 'झोंबी ड्रग्ज'चा शिरकाव? VIDEO व्हायरल, पोलीस सतर्क

मिरा-भाईंदर शहरात काही ठिकाणी नवतरुण युवकांनी झोंबी नावाचे ड्रग्ज घेतल्याने ते त्याच्या प्रभावाखाली विचित्र हालचाली करत असताना दिसून आल्याच्या घटना घडत आहेत. याबाबतचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

Swapnil S

भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात काही ठिकाणी नवतरुण युवकांनी झोंबी नावाचे ड्रग्ज घेतल्याने ते त्याच्या प्रभावाखाली विचित्र हालचाली करत असताना दिसून आल्याच्या घटना घडत आहेत. याबाबतचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी सदरील प्रकार नक्की काय आहे, याची माहिती पोलीस घेत आहेत, असे स्पष्ट केले. तर यात काही नशेचा प्रकार असल्यास त्यावर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. तर याबाबत सदरील घटना नवघरकिंवा भाईंदर पोलीस ठाणे हद्दीतील असल्याचे सांगितले जात आहे, त्याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

या ड्रग्जचे सेवन केलेले तरुण मान व हात वाकवून कंबरेतूनअर्धे अंग खाली टाकत एकाच ठिकाणी विचित्र अवस्थेत स्तब्ध उभे राहतअसल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर दुसरा व्हिडीओ हा भाईंदर पश्चिमेच्या ९० फुटी रोड येथे एक युवक आपले कपडे काढून एकाच ठिकाणी स्तब्ध उभे राहत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सध्या देशात नव्याने आलेले झोंबी ड्रग्जने बंगळुरू, बिहार आणि चंडीगडमध्ये शिरकाव केला असून तेथे अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ यापूर्वी व्हायरल झाले आहेत. आता हे ड्रग्ज मिरा भाईंदरमध्ये आल्याच्या शक्यतेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरा-भाईंदरमध्ये अशा प्रकारच्या घटना दोन ठिकाणी घडल्या आहेत. यामध्ये भाईंदर पश्चिमेला ९० फुटी रोड येथे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानाच्या बाजूला हे झोंबी ड्रग सेवन केलेले तरुण दिसून आले असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ

स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पालक वर्गाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः युवकांमध्ये या ड्रगचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता, ही बाब अधिक गंभीर मानली जात आहे.या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस सतर्क झालेआहेत. संबंधित तरुण नक्की कोण आहे आणि त्याने कोणत्या अंमली पदार्थाचेसेवन केले होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. अलीकडेच हैदराबाद व राजस्थानविविध राज्यात जाऊन पोलिसांनी कोट्यवधींचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते.आता हे नवीन प्रकारचे सिंथेटिक ड्रग्स कुठून आले, याचा तपास केला जातआहे.

झोंबी ड्रग्स नेमके काय असते

"झोंबी ड्रग्ज" म्हणून ओळखले जाणारे हे धोकादायक अंमली पदार्थव्यक्तीच्या मनावर आणि शरीरावर अत्यंत खोलवर परिणाम करतात. यांच्यासेवनामुळे शरीर बधिर होऊ शकते, ज्यामुळे ती व्यक्ती स्वतःवरील ताबा गमावून बसते आणि विचित्र, अनियंत्रित हालचाली करू लागते. नेमक्या याचकारणामुळे, या वर्तनाचे वर्णन झोंबीसारखे असे केले जाते.

Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

Jantar Mantar Assault Case : स्वतंत्र भारद्वाज अटकेत; न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी

Mumbai Dahi Handi 2026 : मालाडमध्ये विटांचा खांब कोसळला; ७ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Dahi Handi 2026 : दहीहंडीच्या उत्साहाला अपघातांचं गालबोट; २२ गोविंदा जखमी

नळदुर्ग किल्ल्यावरून महिला कुस्तीपटूची तीन मुलांसह उडी; सासरच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, चौघांवर गुन्हा दाखल