Mira Road : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मद्यपान करणाऱ्यांना मनसेचा दणका; VIDEO व्हायरल 
मुंबई

Mira Road : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मद्यपान करणाऱ्यांना मनसेचा दणका; VIDEO व्हायरल

व्हिडीओमध्ये मनसे कार्यकर्ते सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या व्यक्तींना जाब विचारताना आणि त्यांना तेथून हटवताना दिसत आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

मीरा रोडमधील काशीमिरा नाका परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी चांगलाच दणका दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उघडपणे मद्यपान करणाऱ्यांना मनसे सैनिकांनी जाब विचारत तेथून हाकलून लावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, काशीमिरा नाका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ काही जण संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी वारंवार एकत्र येऊन मद्यपान करत होते. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.

माहितीनुसार, या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित ठिकाणी अचानक जाऊन मद्यपान करणाऱ्यांना रोखले. तसेच, काहींना चोप देत तेथून हाकलून लावले.

VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये मनसे कार्यकर्ते सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या व्यक्तींना जाब विचारताना आणि त्यांना तेथून हटवताना दिसत आहेत.

मनसेचा इशारा

घटनेनंतर मनसेचे मीरा-भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून नागरिकांना त्रास देणारे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांविरोधात भविष्यातही मनसेकडून अशाच प्रकारची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

सोने दरात उसळी; चांदीही महागली; मौल्यवान धातू महिन्याच्या उच्चांकावर

नागपूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचे कोठडीतही चोचले; नाश्त्याला पिझ्झा, झोपायला मऊ बिछान्याची मागणी

Mumbai : विक्रोळीत सख्ख्या भावांमध्ये रक्तरंजित राडा; मोठ्या आवाजात गाणी लावल्याच्या वादातून डबल मर्डर

रेल्वे परिसरात धूम्रपान केल्यास २ हजारांचा दंड; फेरीवाले, अनधिकृत प्रवेशावरही कडक कारवाई

ठाणे जिल्ह्यात 'कॅन्सर व्हॅन'द्वारे मोफत तपासणी; ऑगस्टभर जनजागृती मोहीम; तीन टप्प्यात मार्गदर्शन