Mumbai : कोस्टल रोडवरील बोगद्यात धावत्या कारला आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची धावपळ, वाहतूक विस्कळीत, Video  (X व्हिडीओ स्क्रीनशॉट्स)
मुंबई

Mumbai : कोस्टल रोडवरील बोगद्यात धावत्या कारला आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची धावपळ, वाहतूक विस्कळीत, Video

कारला आग लागल्याचे दिसताच अनेकांनी आपापली वाहने रस्त्यावरच सोडून बाहेरच्या दिशेने धाव घेतली. काही क्षण...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : कोस्टल रोडवरील हाजी अली-वरळी बोगद्यात बुधवारी (दि.१५) दुपारी धावत्या कारला अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. आगीमुळे वाहनातील प्रवाशांसह इतर वाहनचालकांनीही जीव वाचवण्यासाठी बोगद्याबाहेर धाव घेतली. या घटनेमुळे कोस्टल रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून, अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

धावत्या कारला अचानक आग

बुधवारी दुपारी सुमारे १२.२५ वाजता हाजी अलीहून वरळीकडे जाणाऱ्या बोगद्यातून एक कार जात असताना तिला अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि १०८ रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्याबरोबरच बोगद्यातील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले.

'वाहने सोडून बाहेर पळालो'

घटना घडली तेव्हा बोगद्यात अडकलेले वरळीतील रहिवासी विरेन शाह यांनी सांगितले की, कारला आग लागल्याचे दिसताच अनेकांनी आपापली वाहने रस्त्यावरच सोडून बाहेरच्या दिशेने धाव घेतली. काही क्षण काय घडत आहे हेच समजत नव्हते. त्यावेळी सर्वांचे एकच उद्दिष्ट होते, ते म्हणजे सुरक्षितपणे बोगद्याबाहेर पडणे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

कारला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग वाहनाच्या आतून लागली की अन्य कोणत्या कारणामुळे लागली, याचा तपास संबंधित यंत्रणा करत आहेत.

दक्षिण मुंबईतील वाहतुकीवर परिणाम

घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव कोस्टल रोडवरील संबंधित मार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला. त्यामुळे मरीन ड्राइव्ह, नरिमन पॉइंट, चर्चगेट, मरीन लाइन्स, पी. डी'मेलो रोड, पेडर रोड, हाजी अली आणि वरळी परिसरात वाहतुकीवर परिणाम झाला. प्रशासनाने वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पालकांचं क्षणभर दुर्लक्ष... अन् ४ वर्षीय चिमुकली थेट पहिल्या मजल्यावरून खाली; VIDEO व्हायरल

सरकारी बँकांचे कमिशन वाढले; विमा उत्पादनांच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ

जुलैच्या पावसाने खरीपाला दिला वेग; राज्यात ६७ टक्के पेरण्या पूर्ण

Pune : वारकरी सेवेची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये नोंद; दिवसभरात ३२६४ वारकऱ्यांच्या पायांची केली मालिश, योग विद्या धामने केला विश्वविक्रम

खोल समुद्रातील संपर्कासाठी मच्छिमारांना सॅटेलाइट फोन सुविधा; BSNL सोबत समन्वय; राज्य शासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल