Mumbai : दादर ते सिद्धिविनायक मंदिर गारेगार प्रवास; शनिवारपासून २० ते २२ मिनिटांच्या अंतराने AC बससेवा  (Photo - FPJ)
मुंबई

Mumbai : दादर ते सिद्धिविनायक मंदिर गारेगार प्रवास; शनिवारपासून २० ते २२ मिनिटांच्या अंतराने AC बससेवा

सिद्धिविनायक मंदिरात ये-जा करणाऱ्या भक्तांची व प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता नवीन वातानुकूलित बससेवा शनिवारपासून २० ते २२ मिनिटांच्या अंतराने सोडण्यात येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : सिद्धिविनायक मंदिरात ये-जा करणाऱ्या भक्तांची व प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता नवीन वातानुकूलित बससेवा शनिवारपासून २० ते २२ मिनिटांच्या अंतराने सोडण्यात येणार आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार सिद्धिविनायक मंदिर येथील भाविकांच्या व प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे त्यांच्या सोयीकरिता बेस्ट उपक्रमातर्फे दादर स्थानक (प.) आणि सिद्धिविनायक मंदिर (प्रभादेवी) दरम्यान नवीन वातानुकूलित वर्तुळाकार बसमार्ग 'श्री सिद्धिविनायक फेरी' (ए-८१४) शनिवार २३ मेपासून वर्तुळाकार सेवेत कार्यान्वित करण्यात येत आहे.

बससेवेचा प्रवासमार्ग थांबा

दादर स्थानक (प.), डॉ. ॲन्टोनी डिसिल्वा हायस्कूल, प्रबोधनकार ठाकरे चौक, श्री सिद्धिविनायक मंदिर, रवींद्र नाट्यमंदिर (पोर्तुगीज चर्च), आगरबाजार, दादरस्थानक (प.), (प्रभादेवी) दादर पोलिस ठाणे, शारदाश्रम, कबुतरखाना.

प्रस्थानस्थान बस वेळ

दादर स्थानक (प.) - पहिली बस सकाळी ७ वाजता

दादर स्थानक (प.) - शेवटची बस रात्री ८.५५ वाजता

Pune : जेजुरीत दिंडीच्या ट्रकची वारकऱ्यांना धडक; तीन महिलांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

Mumbai : पायधुणीत ८ वर्षीय चिमुकलीवर सुरक्षारक्षकाकडून लैंगिक अत्याचार, संतप्त नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी

Mumbai : एसी लोकलमध्ये प्रवाशांचा गुदमरला जीव; तांत्रिक बिघाडामुळे १५ मिनिटे मुलुंड स्थानकात खोळंबा, Video

बँकॉकमधील पबला भीषण आग; २७ जणांचा होरपळून मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर, Video

'जव्हार' ठरला १०० टक्के तंबाखूमुक्त शाळांचा पहिला तालुका; सर्व २६८ शाळांना तंबाखूमुक्त प्रमाणपत्र; व्यसनमुक्त समाजाकडे ऐतिहासिक पाऊल