Mumbai : एसी लोकलमध्ये प्रवाशांचा गुदमरला जीव; तांत्रिक बिघाडामुळे १५ मिनिटे मुलुंड स्थानकात खोळंबा, Video  (X व्हिडीओ स्क्रीनशॉट्स)
मुंबई

Mumbai : एसी लोकलमध्ये प्रवाशांचा गुदमरला जीव; तांत्रिक बिघाडामुळे १५ मिनिटे मुलुंड स्थानकात खोळंबा, Video

टिटवाळा-सीएसएमटी एसी लोकल मुलुंड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर उभी असताना तिची वातानुकूलन यंत्रणा बंद पडली...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : सकाळच्या गर्दीच्या वेळी सोमवारी (दि. १३) मध्य रेल्वेच्या टिटवाळा-सीएसएमटी एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. वातानुकूलन यंत्रणा अचानक बंद पडल्याने मुलुंड स्थानकात लोकल सुमारे १५ मिनिटे खोळंबली. डब्यात उष्णता वाढून हवा खेळती नसल्याने अनेक प्रवाशांचा अक्षरशः जीव गुदमरला. काहींना श्वास घेण्यास त्रास झाला, तर एका प्रवाशाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले.

मुलुंड स्थानकात गोंधळ

सकाळी ८.३३ वाजताची टिटवाळा-सीएसएमटी एसी लोकल मुलुंड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर उभी असताना तिची वातानुकूलन यंत्रणा बंद पडली. जवळपास १० मिनिटांहून अधिक काळ डब्यांमध्ये एसी बंद असल्याने उष्णता वाढली आणि हवेशीरपणाचा अभाव निर्माण झाला. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

अनेकांना श्वास घेण्यास त्रास

डब्यांमध्ये हवा खेळती नसल्याने अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाला. काही महिला प्रवासी बेशुद्ध पडल्याचा आरोपही करण्यात आला. परिस्थिती गंभीर होताच सहप्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत प्रवाशांना डब्याबाहेर काढले.

तांत्रिक बिघाडामुळे प्रकार

प्राथमिक माहितीनुसार, एसी लोकलच्या वातानुकूलन यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने हा प्रकार घडला. वातानुकूलन प्रणालीतील एक यंत्रणा कार्यरत नसल्याने संपूर्ण डब्यातील हवा बंद झाली.

कुर्ला स्थानकात गाडी थांबवली

टिटवाळाहून सीएसएमटीकडे निघालेली ही लोकल पुढे कुर्ला स्थानकात थांबवण्यात आली. मध्य रेल्वेने सर्व प्रवाशांना खाली उतरवून ही गाडी सेवेतून काढून घेतली. त्यानंतर गाडीचे दरवाजे उघडे ठेवून पुढील हालचाल करण्यात आली, जेणेकरून डब्यात हवा खेळती राहील.

अलीकडेच वाढवल्या एसी लोकल सेवा

गेल्याच महिन्यात मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय मार्गावर १२ नव्या वातानुकूलित लोकल सेवांचा प्रारंभ केला होता. मात्र, या घटनेमुळे एसी लोकलच्या देखभाल आणि तांत्रिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पुढील आठवड्यात बँका चार दिवस बंद; ११ सप्टेंबर रोजी बँक संघटनांचा संप

Mira-Bhayandar : ५.१४ लाख मतदारांपैकी २.१३ लाख नोंदी बाद

दहशतवादाविरुद्ध लढ्याचे मोदींचे आवाहन; शांघाय सहकार्य संघटनेत पाकिस्तानवर जोरदार टीका

'सहा लाख' मतदार वगळले; २ लाख ७० हजार मतदारांचा 'पत्ता'च नसल्याचे उघड, निवडणूक विभागाचा दावा

एक्स्प्रेसमध्ये दिवा लावून पूजा करणाऱ्या प्रवाशावर कारवाई; आरोपीवर विविध कलमांनुसार कारवाई