Mumbai : विविध दुर्घटनेत ७२० बळी; साडेसहा वर्षात २,४०८ जखमी, RTI मधून धक्कादायक आकडेवारी उघड (Photo - X) | संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : विविध दुर्घटनेत ७२० बळी; साडेसहा वर्षात २,४०८ जखमी, RTI मधून धक्कादायक आकडेवारी उघड

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत विविध दुर्घटनांचा धोका कायम आहे. आग, झाड कोसळून मृत्यू, इमारत व इमारतींचा भाग कोसळून मृत्यू, उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू अशा दुर्घटनांनी गेल्या साडेसहा वर्षांत ७२० जणांचा बळी घेतला असून २,४०८ जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.

Swapnil S

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत विविध दुर्घटनांचा धोका कायम आहे. आग, झाड कोसळून मृत्यू, इमारत व इमारतींचा भाग कोसळून मृत्यू, उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू अशा दुर्घटनांनी गेल्या साडेसहा वर्षांत ७२० जणांचा बळी घेतला असून २,४०८ जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.

झाड व झाडांच्या फांद्या कोसळून, दरड कोसळून, उघड्या मॅनहोलमध्ये पडून, इमारत व इमारतींचा भाग कोसळून अशा आपत्कालीन दुर्घटनांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०२० ते सप्टेंबर २०२६ या साडेसहा वर्षांच्या कालावधीत मुंबईत विविध आपत्कालीन दुर्घटनांमध्ये एकूण ७२० नागरिकांचा मृत्यू झाला असून २,४०८ नागरिक जखमी झाले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत मागविलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.

आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली माहिती

शकील अहमद शेख यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे २०२० ते २०२६ या कालावधीत घडलेल्या आपत्कालीन दुर्घटनांची संख्या, त्यामध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या आणि जखमींची संख्या याबाबत माहिती मागवली होती. त्यावर महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक अभियंता सुनील जाधव यांनी माहिती अधिकार अधिनियमांतर्गत ही माहिती उपलब्ध करून दिली.

पाणी, नाले, मॅनहोल ठरत आहेत जीवघेणे

माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या म्हणण्यानुसार, समुद्र, नाले, नद्या, विहिरी, खाड्या, खाणी आणि मॅनहोलमध्ये पडून एकूण ३२८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २३७ पुरुष आणि ९१ महिलांचा समावेश आहे.

या आकडेवारीमुळे मुंबईतील सार्वजनिक सुरक्षितता, उघडे मॅनहोल, नाल्यांच्या परिसरातील संभाव्य धोके आणि जलस्रोतां सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. त्याबाबत उपाय करावेत, अशी मागणी केली.

कोणत्या दुर्घटनांमध्ये किती मृत्यू व किती जखमी

  • झाडे व झाडांच्या फांद्या पडणे : २२ मृत्यू, ३०६ जखमी

  • दरड कोसळणे: ३९ मृत्यू, ३३ जखमी

  • घरे, भिंती व इमारतींचे भाग कोसळून : १७९ मृत्यू, ८६४ जखमी

  • आग व शॉर्टसर्किट: १६८ मृत्यू, १,०४८ जखमी

  • समुद्रात किंवा विहिरीत पडणे: १९५ मृत्यू, ४४ जखमी

  • मॅनहोल किंवा नाल्यात पडणे: ५६ मृत्यू, ७७ जखमी

  • वीजप्रवाहाचा धक्का लागणे : ४० मृत्यू, ५७ जखमी

सुरक्षेची तपासणी यंत्रणा अधिक सक्षम करणे

शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना पत्र पाठवून आपत्कालीन दुर्घटना रोखण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. धोकादायक ठिकाणांची नियमित तपासणी, उघड्या मॅनहोल व नाल्यांवर सुरक्षित उपाययोजना, इमारतींच्या सुरक्षिततेची तपासणी आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता शकील अहमद शेख यांनी व्यक्त केली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

अनावश्यक खर्चावर नियंत्रण; वित्त विभागाचे सर्व खात्यांना निर्देश जारी

अविनाश भोसलेंच्या जप्त केलेल्या मालमत्तांवरील टाच हटवण्याचे आदेश; हायकोर्टाचा ED ला मोठा झटका; न्यायालय म्हणते...

Mumbai : अखेर ३० महिन्यांनंतर सायन पूल सेवेत; विद्याविहार, गोरेगाव-मुलुंड उड्डाणपुलांचे आज लोकार्पण

'निष्पक्ष निवडणुकीसाठी हात बांधलेले नाहीत' - सर्वोच्च न्यायालय

न्यूझीलंडची वारी आजपासून! टी-२० मालिकेसाठी भारत सज्ज; वातावरणाशी जुळवून घेण्याचे आव्हान