अंधेरी, गोरेगावातील अतिक्रमण हटवले; अकराशे मीटर लांब फुटपाथवरील बेकायदा बांधकामांवर हातोडा; स्टॉल, बेकायदा बांधकामे, वाढीव शेड केले जमीनदोस्त 
मुंबई

अंधेरी, गोरेगावातील अतिक्रमण हटवले; अकराशे मीटर लांब फुटपाथवरील बेकायदा बांधकामांवर हातोडा; स्टॉल, बेकायदा बांधकामे, वाढीव शेड केले जमीनदोस्त

‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत कारवाईला वेग आला आहे. अंधेरी व गोरेगाव येथील फुटपाथावरील बेकायदा बांधकामे, स्टॉल्स, तात्पुरत्या शेडवर बुधवारी हातोडा मारण्यात आला.

Swapnil S

मुंबई : ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत कारवाईला वेग आला आहे. अंधेरी व गोरेगाव येथील फुटपाथावरील बेकायदा बांधकामे, स्टॉल्स, तात्पुरत्या शेडवर बुधवारी हातोडा मारण्यात आला. पदपथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून ५० टक्के मुंबईकर याचा नियमित वापर करतात. त्यामुळे सुरक्षित व सुलभ फुटपाथ देणे मुंबई महापालिकेचे कर्तव्य आहे.

मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मुंबई महापालिकेच्या २६ विभागीय क्षेत्रातील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. परिमंडळ ४ च्या उपायुक्त भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली तर ‘पी’ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली श्री राम मंदिर रोड (घासबाजार रोड) तसेच नेस्को सेंटर सर्व्हिस रोड येथील एकूण अंदाजे १,१०० मीटर लांबीच्या परिसरात ‘पदचारी प्रथम’ अभियानांतर्गत विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली.

अंधेरी, गोरेगावातील अतिक्रमण हटवले; अकराशे मीटर लांब फुटपाथवरील बेकायदा बांधकामांवर हातोडा, स्टॉल, बेकायदा बांधकामे, वाढीव शेड केले जमीनदोस्त

जे. पी. रोड फुटपाथवरील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त

तर अंधेरी पश्चिम येथील जे. पी. रोडच्या फुटपाथवरील बेकायदा बांधकामे, स्टॉल, तात्पुरत्या शेड जमीनदोस्त करण्यात आले. के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमणमुक्त फुटपाथ ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांनी सांगितले.

पदपथांवरील अडथळे केले दूर

या मोहिमेदरम्यान पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले, विविध प्रकारची अतिक्रमणे, कचरा तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षित, सुलभ व अडथळामुक्त हालचालींमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या अन्य वस्तू हटविण्यात आल्या. या कारवाईमुळे संबंधित पदपथांवरील अडथळे दूर होऊन पादचाऱ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ व अडथळामुक्त मार्ग उपलब्ध करण्यात आला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

विकास प्रकल्पांना गती; 'महाराष्ट्र लँड बँक', 'महाभूमी स्टॅक' प्रणालीचे महसूलमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण

पालघर रुग्णालय हल्ला प्रकरण : पोलिसांच्या कारभारावर हायकोर्टाचे ताशेरे

आकड्यांच्या पलीकडे तथ्याचे आकलन

तब्बल १८ अब्ज डॉलर्सचा समझोता

जेवल्यानंतर लगेच आंघोळ करणं टाळावं का? जाणून घ्या