Mumbai : वांद्रे येथील मैदानाच्या आरक्षण बदलाचा प्रस्ताव मंजूर; नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानावर प्रदर्शन व सेंटर उभारण्याचा मार्ग मोकळा (Photo-SALMAN ANSARI)
मुंबई

Mumbai : वांद्रे येथील मैदानाच्या आरक्षण बदलाचा प्रस्ताव मंजूर; नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानावर प्रदर्शन व सेंटर उभारण्याचा मार्ग मोकळा

वांद्रे रेक्लमेशन येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानाचे आरक्षण खेळाच्या मैदानाऐवजी ‘कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर’साठी बदलण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या सभागृहात मंगळवारी रात्री सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीच्या बहुमताने मंजूर करण्यात आला.

Swapnil S

मुंबई : वांद्रे रेक्लमेशन येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानाचे आरक्षण खेळाच्या मैदानाऐवजी ‘कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर’साठी बदलण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या सभागृहात मंगळवारी रात्री सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीच्या बहुमताने मंजूर करण्यात आला. सुधार समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नगरसेविका संध्या दोशी यांनी मांडलेला हा प्रस्ताव सभागृहाच्या अजेंडा क्रमांक २२ वर होता.

या निर्णयाला शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. मुंबईतील मोकळ्या जागा दिवसेंदिवस कमी होत असताना आणखी एका महत्त्वाच्या मैदानाचे आरक्षण बदलून ते व्यावसायिक व कार्यक्रमांसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा करणे योग्य नसल्याचा आरोप विरोधकांनी केला.

वांद्रे येथील काँग्रेसचे नगरसेवक राजा रेहबर खान यांनी या प्रस्तावाला विरोध करताना, ‘‘या मैदानावर अनेक पिढ्यांनी खेळ खेळले आहेत. सुमारे २०० क्लब या मैदानाशी जोडलेले आहेत. २००७ पासून हा माझा प्रभाग आहे. आम्ही लहानपणी याच मैदानावर फुटबॉल आणि क्रिकेट खेळलो. त्यावेळी या जागेला मैदानाचे आरक्षणही नव्हते. नगरसेवक म्हणून हे मैदान वाचवता आले नाही, तर ही लाजिरवाणी बाब आहे,’’ अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. काँग्रेसचे नेते अशरफ आझमी यांनीही प्रस्तावाला विरोध करत हा विषय मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...