Mumbai : आणखी १५० दुमजली ईव्ही बसेस; १० ओपन डबल डेकर बसची सफर, BEST समितीची मंजुरी  प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : आणखी १५० दुमजली ईव्ही बसेस; १० ओपन डबल डेकर बसची सफर, BEST समितीची मंजुरी 

मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात आणखी १५० दुमजली वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल होणार आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात आणखी १५० दुमजली वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल होणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या बसमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल स्टेबिलिटी कंट्रोल (ईव्हीएससी) यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गुरुवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दरम्यान, १५० डबल डेकर बसेस पैकी १० डबल डेकर बसेस ओपन डेक ठेवण्यात याव्यात, असे निर्देश बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी बैठकीत दिले.

२०२२ मध्ये बेस्टने २०० दुमजली बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यापैकी ५० बसगाड्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार दुमजली बसमध्ये ईव्हीएससी यंत्रणा अनिवार्य करण्यात आली. या अतिरिक्त सुरक्षाव्यवस्थेमुळे कंत्राटदाराच्या खर्चात वाढ झाल्याने प्रति किलोमीटर ४.१७ रुपये अतिरिक्त दराची मागणी करण्यात आली होती. या मागणीची बेस्टच्या अभियंता, वाहतूक, लेखा, विधी, लेखापरीक्षण आणि सामग्री व्यवस्थापन विभागांच्या प्रतिनिधींच्या समितीने छाननी केली. त्यानंतर झालेल्या वाटाघाटींमध्ये प्रति किलोमीटर ३.८५ रुपये दरवाढीस मंजुरी देण्यात आली. त्यामुळे बेस्टच्या संचालन खर्चात वाढ होणार असली तरी ईव्हीएससी यंत्रणेमुळे बसची स्थिरता वाढून प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

कॅमेरे, मोबाईल चार्जिंगची व्यवस्था!

या दुमजली वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या प्रदूषणमुक्त आणि प्रवाशांसाठी अधिक आरामदायी असणार आहेत. बसमध्ये दोन्ही बाजूंना स्वयंचलित दरवाजे असल्याने गर्दीच्या वेळी प्रवाशांना चढणे-उतरणे अधिक सोयीचे होणार आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल चार्जिंगची सुविधा यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता