Mumbai : मालमत्ता पुनर्विकासासाठी नवे धोरण; वाढीव FSI वर प्रीमियम आकारणार, BMC च्या तिजोरीत कोट्यवधीची भर पडणार संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : झोपड्यांवर कारवाई तर होणारच; महापालिका भूमिकेवर ठाम

मुंबईतील विशेषतः गोवंडी मानखुर्द शिवाजीनगर या भागातील १४ फूट आणि त्यापेक्षा उंच झोपड्यांवरील कारवाईला सर्वपक्षीयांकडून विरोध होत आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील विशेषतः गोवंडी मानखुर्द शिवाजीनगर या भागातील १४ फूट आणि त्यापेक्षा उंच झोपड्यांवरील कारवाईला सर्वपक्षीयांकडून विरोध होत आहे. मात्र मुंबई महापालिका आपल्या निर्णयावर ठाम असून नियमीत कारवाई अंतर्गत आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झोपड्यांवर कारवाई करणार असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई शहर आणि उपनगरांत एकूण २ लाख २३ हजार १५० झोपड्या असून त्यापैकी ३९ हजार १११ झोपड्या १४ फूट किंवा त्यापेक्षा अधिक उंचीच्या असल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळले आहे. यामध्ये शहरातील ३ हजार ३४८, पश्चिम उपनगरातील ४ हजार ५३६ आणि पूर्व उपनगरातील तब्बल ३१ हजार २२७ झोपड्यांचा समावेश आहे. यापैकी ४ हजार ५८४ झोपड्यांवर यापूर्वी निष्कासनाची कारवाई, तर ६११ झोपड्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. उर्वरित अनधिकृत बांधकामे स्वतःहून हटवावीत, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या कारवाईला भाजप, शिवसेना (उबाठा), काँग्रेससह विविध पक्षांनी विरोध केला आहे. रहिवाशांचे पुनर्वसन, सर्वेक्षण आणि पर्यायी व्यवस्था याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. वॉर्डस्तरावरील अधिकाऱ्यांना कारवाई थांबविण्याचे कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही, पण २४ तास फोडण्याचीही मुभा नाही; सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट पवित्रा

आधार प्रमाणीकरण सक्तीचे; मालमत्ता खरेदी-विक्रीबाबत अधिसूचना जारी, आजपासून अंमलबजावणी

टाटा ट्रस्टमधील वाद शिगेला; वेणू श्रीनिवासन यांची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार, प्रशासकीय कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी

Mumbai : विमान उड्डाण सुरक्षेला मोठा धोका; हवाई वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांचा दावा, नव्या डिस्प्ले सिस्टीममुळे अधिकाऱ्यांना त्रास

MSP Hike : रब्बी पिकांच्या ‘एमएसपी’त वाढ; शेतकऱ्यांसाठी केंद्राचा मोठा निर्णय