मुंबई

Mumbai : सव्वा वर्षांनंतर एकनाथ शिंदेंचा महापौर? मुंबई महापालिकेतील सत्ता समीकरण बदलणार; महायुतीत एकमत झाल्याची चर्चा

मुंबई महापालिकेत भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांनी अडीच वर्षांसाठी महापौरपदाची धुरा सांभाळली आहे. मात्र...

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांनी अडीच वर्षांसाठी महापौरपदाची धुरा सांभाळली आहे. मात्र, महायुतीत महापौर, स्थायी समिती अध्यक्ष पद यावरुन अजूनही धुसफूस सुरूच आहे. मुंबई महापालिकेतील महापौरपदावरुन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नाराजीचा सूर आळवला जात आहे‌. त्यामुळे सव्वा वर्षांनंतर शिंदे सेनेचा महापौर बसवण्याच्या हालचालींना वेग आला असून महायुतीत समन्वयाचा अभाव असल्याने मुंबई महापालिकेतील सत्ता समीकरण बदलण्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

तब्बल चार दशकानंतर मुंबई महापालिकेत भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सहकार्याने सत्ता स्थापनेचा कौल मिळाला आहे. मात्र महापौर पद, स्थायी समिती, सुधार समिती अशा महत्वाच्या पदावरुन भाजप व शिंदे सेनेत चर्चा सुरू होती. अखेर भाजपला महापौर, तर शिंदे सेनेला उपमहापौरपद देण्याबाबत भाजप व शिंदे सेनेत चर्चा झाली आणि महापौरपदी भाजपच्या नगरसेविका रितू तावडे तर उपमहापौरपदी शिंदे सेनेचे संजय घाडी विराजमान झाले. अडीच वर्षे भाजपचा महापौर असा तोडगा महायुतीत निघाला आणि भाजपच्या नगरसेविका महापौरपदी अडीच वर्षांसाठी विराजमान झाल्या आहेत.

स्थायी समितीवरून धुसफूस

महापौरपद भाजपकडे गेल्याने शिंदे सेनेने स्थायी समितीवर दावा केला होता. मात्र, पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेली स्थायी समिती भाजपने आपल्याकडेच ठेवली. त्यामुळे शिंदे सेनेचे नगरसेवक नाराज झाले असून त्यांनी महापौरपदावर दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर सव्वा वर्षे महापौरपद शिंदे सेनेकडे द्यावे, अशी महायुतीत चर्चा झाल्याचे समजते. अडीच वर्षाऐवजी सव्वा वर्ष आता भाजपचा तर पुढील सव्वा वर्ष शिंदे सेनेचा महापौर यावर महायुतीत एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे उपमहापौरपद आले असून महापौरपदाप्रमाणेच सव्वा वर्ष शिंदे सेनेचा उपमहापौर असणार आहे.

Mumbai : गोरेगाव-मुलुंड २० मिनिटांत; जीएमएलआर प्रकल्पात ‘तुळशी’ खोदणार बोगदा, नॅशनल पार्कखाली भूमिगत बोगदा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : मुख्य आरोपी सचिन अंदूरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती, HC चा मोठा निर्णय

बापरे! मध्यान्ह भोजनात मिठाऐवजी चक्क डिटर्जंट? जेवणानंतर २४ हून अधिक विद्यार्थी रुग्णालयात दाखल, VIDEO

संतापजनक! पालघरमध्ये १० वर्षांच्या मुलीवर ५० वर्षीय काकाकडून अत्याचार; FIR नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ? कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Mumbai : चर्चगेट येथील मुलींच्या हॉस्टेलमधील पाणीटंचाईची हायकोर्टाकडून दखल; महापालिका आणि विद्यापीठाला नोटीस