'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : ५० फेलोच्या जागेसाठी बीटेक, डॉक्टरांचे अर्ज; ५० जागांसाठी ४५०० जणांचे आवेदन, महापालिकेत कंत्राटी भरती

मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष, पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांसह विविध विभाग प्रमुखांच्या कामासाठी ५० फेलोंची फक्त एक वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष, पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांसह विविध विभाग प्रमुखांच्या कामासाठी ५० फेलोंची फक्त एक वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. या एक वर्षाच्या कंत्राटी नोकरीसाठी डॉक्टर, बीटेक, बीई, एलएलबी, एलएलएम आदी उच्चशिक्षित तरुणांनी अर्ज केले.

मुंबई महापालिकेने याबाबत जाहिरात प्रसिद्ध करताच उच्च शिक्षित ‘जेन झीं’नी काम मिळावे यासाठी अर्ज केले आहेत. साडेचार हजार फेलो उमेदवारांची नोंदणी केली असून अडीच हजार फेलोंनी ऑनलाईन माहिती सादर केली आहे. फक्त एक वर्षासाठी जॉब, पण तरुण उमेदवारांचे मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने मुंबईत बेरोजगारी वाढतेय हे वास्तव समोर आले आहे.

पालिकेत वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने फेलो उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. याबाबत १९ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शुक्रवारपर्यंत तब्बल ४,५१० उमेदवारांनी नोंदणी केली. अडीच हजारांहून अधिक उमेदवारांनी ऑनलाइन माहिती भरली. ५३० जणांनी प्रत्यक्ष शुल्क भरून अर्ज प्रक्रियेत सहभाग निश्चित केला. एलएलबी, एलएलएम, एमबीबीएस, एमई-एमटेक, एमएमएस, बीकॉम, बीएससी, बीए, एमए अशा विविध उच्चशिक्षित पदवीधरांनी या फेलोशिपसाठी अर्ज केले आहेत.

महापालिका फेलोंना दरमहा ६१५०० रुपये मानधन देणार असली तरी ही नियुक्ती केवळ एका वर्षासाठी आहे. तरी हजारो तरुणांनी दाखविलेली उत्सुकता ही रोजगाराच्या मर्यादित संधींचे चित्र स्पष्ट करणारी आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नवी मुंबई विमानतळावरून FLY91ने घेतली भरारी! 'या' ४ ठिकाणी थेट विमानसेवा; पहिल्या फ्लाइटचं खास स्वागत, VIDEO

Thane : भविष्यात ठाण्यात पाणी टंचाईचे सावट गडद; ३१ एमएलडीची तूट

Mumbai : बेस्ट, रेल्वे, MMRDA पालिकेचे थकबाकीदार; पाण्याच्या बिलापोटी चार हजार कोटी थकवले

भटक्या श्वानांना आता कायमस्वरूपी निवारा; निर्बीजीकरणानंतर भटक्या कुत्र्यांचे ठिकाण बदलणार, प्रती श्वान १५५ रुपये खर्च करणार

'ऑक्टोबर हिट'चा सिंधुदुर्गाला तडाखा; वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण; तापमान ३४ ते ३६ अंश दरम्यान