Mumbai : बोगस ॲडमिशन रॅकेट उद्ध्वस्त; १० जणांना अटक प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : बोगस ॲडमिशन रॅकेट उद्ध्वस्त; १० जणांना अटक

आयआयटीसह इतर नामांकित शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पवई पोलिसांनी रविवारी पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे.

Swapnil S

मुंबई : आयआयटीसह इतर नामांकित शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पवई पोलिसांनी रविवारी पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे.

आरोपी पुण्यात दोन बनावट कॉल सेंटर चालवत होते आणि 'इन्स्टाग्राम'च्या माध्यमातून प्रवेशोत्सुक विद्यार्थी व पालकांशी संपर्क साधत होते. आरोपींनी ‘आयआयटी हैदराबाद’, ‘पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी’, ‘नेताजी सुभाष युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी’आणि ‘दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी’ यांसारख्या संस्थांमध्ये एनआरआय किंवा व्यवस्थापन कोट्यातून जागा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.

पवई येथील रहिवासी ४१ वर्षीय योगी स्वामी यांनी जुलै महिन्यात दिलेल्या तक्रारीवरून हा प्रकार उघडकीस आला. स्वामी यांनी आपल्या मुलाच्या प्रवेशासाठी ‘इन्स्टाग्राम’वरील एका खात्याद्वारे गौतम आणि सुमित नावाच्या व्यक्तींशी संपर्क साधला होता. आरोपींनी ‘आयआयटी हैदराबाद’मध्ये प्रवेशाचे आश्वासन देऊन स्वामी यांच्याकडून ऑनलाइन स्वरूपात १६.४० लाख रुपये उकळले आणि फसवणूक केली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पवई पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपींनी फसवणुकीच्या पैशातून पाच मोबाईल खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. या मोबाईलचे लोकेशन पुण्यात मिळताच पवई पोलिसांनी विमान नगर पोलिसांच्या मदतीने पुण्याच्या विमान नगर भागात छापा टाकून १० जणांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून २२ मोबाईल, २३ सिमकार्ड, एक लॅपटॉप, सात डेबिट कार्ड, एक जिओबुक, दोन गाड्या, २४ लाख रुपयांची रोकड आणि कागदपत्रे जप्त केली आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Navratri 2026 : नवरात्रीचे नऊ दिवस अन् देवीची नऊ रूपं! प्रत्येक रूपामागे दडलाय खास अर्थ, तुम्हाला माहीत आहे का?

Navratri 2026 Wishes : 'उदे गं अंबे उदे!' नवरात्रीनिमित्त प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश अन् HD कार्ड्स

Navratri 2026 : उकडलेल्या रताळ्यांना द्या कुरकुरीत ट्विस्ट; उपवासासाठी 'असा' बनवा झटपट चाट

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...