Mumbai : मोगरा नाल्यात कचरा टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल; ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद (X व्हिडीओ स्क्रीनशाॅट्स)
मुंबई

Mumbai : मोगरा नाल्यात कचरा टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल; ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

पुनर्प्रक्रियेसाठी नेण्यात येणारा सुका कचरा बेकायदा पद्धतीने मोगरा नाल्यात टाकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

Swapnil S

मुंबई : पुनर्प्रक्रियेसाठी नेण्यात येणारा सुका कचरा बेकायदा पद्धतीने मोगरा नाल्यात टाकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. अखेर या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवार १४ सप्टेंबर रोजी अंधेरी पश्चिम येथील मोगरा नाल्यात कचरा टाकण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. १४ सप्टेंबर रोजी अंधेरी लोखंडवाला-ओशिवरा सिटिझन्स असोसिएशनने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये महापालिकेचा टेम्पो अंधेरीतील मोगरा नाल्याजवळ सुका कचरा टाकत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

अखेर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली, तर दुसरीकडे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षक अनिश बोरिचा (५४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी रात्री हा गुन्हा नोंदविण्यात आला.

तक्रारीनुसार, अंधेरी परिसरातून गोळा करण्यात आलेला सुका कचरा वर्गीकरण आणि पुनर्प्रक्रियेसाठी अधिकृत केंद्रात नेण्याऐवजी नाल्यात टाकण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे पर्यावरणीय हानी होण्याबरोबरच नाल्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तपासणी, निदान अन् वेळीच उपचार; प्राथमिक ते तृतीयस्तरीय आरोग्यसेवेचे बळकटीकरण, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला ‘प्रगती’चा बूस्टर

चंद्रा हवेत, चंद्रा नकोत; टाटा सन्सची मान्यता, टाटा ट्रस्टचा विरोध, शेअर बाजारात नोंदणी प्रक्रिया सुरू करणार

Mumbai : सायन पुलाला नवी तारीख; फेब्रुवारीत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन

सोने खरेदीत ग्राहकांचे ‘थांबा, वाट पाहा’ धोरण; जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालातून उघड

Mumbai : पेट्रोलपंप चालकांचा ‘यूपीआय बंद’चा इशारा; २ हजारांवरील व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळण्याची मागणी