Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक

रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि अन्य अभियांत्रिकी कामांसाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री, तर मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि अन्य अभियांत्रिकी कामांसाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री, तर मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान लोकल सेवा रद्द राहणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. ठाण्याहून सुटणाऱ्या अप धीम्या लोकल मुलुंड येथे जलद मार्गावर वळवून पुढे माटुंग्यापर्यंत जलद मार्गावर चालवण्यात येतील. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील लोकल नियोजित वेळेपेक्षा सुमारे १५ मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे.

सीएसएमटीकडून येणाऱ्या लोकलही रद्द

सीएसएमटीकडून येणाऱ्या लोकलही रद्द केल्या जाणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. या ब्लॉक काळात सीएसएमटीहून वाशी, बेलापूर आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेतील लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील तसेच पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसएमटीकडे येणाऱ्या सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ या वेळेतील लोकलही रद्द राहतील. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील तसेच सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना पर्यायी मार्गाने ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान नाईट ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री १२.३० ते रविवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या काळात सर्व जलद लोकल सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान धीम्या मार्गावरून चालवण्यात येतील. तसेच काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई धमक्यांनी हादरली! महापौर कार्यालय, अमिताभ यांचे निवासस्थान, शैक्षणिक संस्थांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

ऑडिओ क्लिपप्रकरणी फॉरेन्सिक तपास; महायुतीत बेबनाव वाढत चालला

Mumbai : सीएसएमटी भुयारी मार्ग प्रदूषणाच्या विळख्यात; BMC मुख्यालयाजवळच अनधिकृत विक्रेत्यांचे बस्तान

FSSAI च्या नियमांना महाराष्ट्राचे उच्च न्यायालयात आव्हान; राज्याच्या अधिकारांवर केंद्राने अतिक्रमण केल्याचा आरोप

भारत-चीन सैन्यात चकमकी; अरुणाचलबाबत इंडो-तिबेट सीमा दलाच्या महासंचालकांचा गौप्यस्फोट