Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार ६ सप्टेंबर रोजी उपनगरीय मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार ६ सप्टेंबर रोजी उपनगरीय मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मेन लाइनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यानच्या ‘अप’ आणि ‘डाऊन’ धीम्या मार्गांवर आणि हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी/वांद्रे दरम्यानच्या अप व डाऊन मार्गांवर घेण्यात येईल.

मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार अप आणि डाऊन धीमा मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि त्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ व भायखळा स्थानकांवर थांबतील.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी-बेलापूर-पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ या वेळेत वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या 'डाऊन' हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉकच्या कालावधीत पनवेल आणि कुर्ला (फलाट क्रमांक ८) दरम्यान २० मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जातील.

पश्चिम रेल्वेवरही जम्बोब्लॉक

ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी पश्चिम रेल्वेद्वारे ६ सप्टेंबर रोजी चर्चगेट आणि मुंबई सेंट्रलदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत अप आणि डाऊन जलद मार्गांवर ५ तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील सर्व गाड्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान धीम्या मार्गावरून चालवल्या जातील. या ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय सेवा रद्द राहतील, तर चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या काही गाड्या वांद्रे किंवा दादर स्थानकांवरच थांबवून तिथूनच परत वळवल्या जातील.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

डीजेचे स्तोम संपलेले दिसेल; मुख्यमंत्र्यांचा दावा, लवकरच सरकार घेणार निर्णय, 'कायद्याचा बडगा नको, लोकांना विश्वासात घ्यायला हवे'

मुंबईत ऑगस्टमध्ये ६६ टक्के कमी पाऊस; ३५ वर्षांतील नीचांक

Mumbai : ३० स्टॉल्सवर हातोडा; भायखळा, मुंबई सेंट्रलमध्ये 'पादचारी प्रथम'; नायर रुग्णालय मार्गावर २७ स्टॉल्सना नोटीस

कोयना धरण शंभर टक्के भरले; १०५.२५ टीएमसी पाणीसाठा

Mumbai : गोरेगावमध्ये खासगी बसला भीषण आग; वाहतूक ठप्प