मुंबई

Mumbai : सीजीएसटी अधीक्षकाला ५ लाखांची लाच घेताना अटक; CBI ची मोठी कारवाई

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नरीमन पाईंट येथील एअर इंडिया इमारत कार्यरत असलेले सीजीएसटी ऑडिट-१ चे अधीक्षक अंकित अगरवाल याला एका खासगी कंपनीच्या संचालकाकडून ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक केली.

Swapnil S

आशीष सिंह/मुंबई

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नरीमन पाईंट येथील एअर इंडिया इमारत कार्यरत असलेले सीजीएसटी ऑडिट-१ चे अधीक्षक अंकित अगरवाल याला एका खासगी कंपनीच्या संचालकाकडून ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक केली.

सीबीआयने सांगितले की, कंपनीच्या संचालकाने दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे २२ डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीत असा आरोप करण्यात आला होता की, कंपनीच्या ऑडिटदरम्यान उद्भवलेल्या मुद्द्यांचा निकाल लावण्यासाठी अगरवाल यांनी बेकायदेशीर रकमेची मागणी केली होती.

अगरवाल याने २६ नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रारदाराच्या कंपनीचे ऑडिट केले होते. त्यानंतर त्यांनी ९८ लाख रुपयांची बनावट कर मागणी उभी करण्याची धमकी दिली. हा विषय निकाली काढण्यासाठी त्यांनी २० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. चर्चेनंतर ही रक्कम १७ लाख रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. त्यापैकी ५ लाखांचा पहिला हप्ता २२ डिसेंबरला देण्याचे ठरले होते. मात्र, सीबीआयने सीबीआयने सापळा रचून अगरवाल याला ५ लाखांची लाच घेताना अटक केली. दरम्यान, अगरवालच्या कार्यालयातही झडती घेतली असता तक्रारदार कंपनीच्या ऑडिट अहवालाशी संबंधित डिजिटल पुरावे जप्त केले.

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती

LPG ग्राहकांनो लक्ष द्या! e-KYC अनिवार्य; मोबाईलवर काही मिनिटांत पूर्ण करा ही प्रक्रिया

Thane : व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार; हॉटेल व्यावसायिकांची कारवाईची मागणी

श्रीरामपूरमधील जमीन मंत्र्याच्या घशात घालण्याचा डाव! काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांचा आरोप

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपहारगृहाचा गॅससाठा संपला; रोजच्या १५०० लोकांच्या जेवणाचे वांदे