मुंबई

Mumbai : उत्पन्नाची लपवालपवी करणाऱ्या पतीला न्यायालयाचा दणका; पत्नीला पोटगी देण्याचे आदेश

पत्नीला पोटगीची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत उत्पन्नाची दंडाधिकारी लपवालपवी करणाऱ्या पतीला बोरिवलीतील न्यायालयाने मोठा दणका दिला. घरगुती हिंसाचार कायद्याच्या प्रकरणात पतीला फटकारत न्यायालयाने अर्जदार पत्नीला दरमहा ७,००० रुपये अंतरिम पोटगी आणि ७,००० रुपये पर्यायी निवासाचे भाडे अशी एकूण १४ हजारांची रक्कम मंजूर केली.

Swapnil S

मुंबईः पत्नीला पोटगीची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत उत्पन्नाची दंडाधिकारी लपवालपवी करणाऱ्या पतीला बोरिवलीतील न्यायालयाने मोठा दणका दिला. घरगुती हिंसाचार कायद्याच्या प्रकरणात पतीला फटकारत न्यायालयाने अर्जदार पत्नीला दरमहा ७,००० रुपये अंतरिम पोटगी आणि ७,००० रुपये पर्यायी निवासाचे भाडे अशी एकूण १४ हजारांची रक्कम मंजूर केली.

अर्जदार महिला आणि प्रतिवादी पती यांचा विवाह २६ मे २०२२ रोजी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी पैशांची मागणी करत तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. तिला मारहाणही केली. १६ जुलै २०२३ रोजी ३ लाख रुपयांची मागणी पूर्ण न केल्याने सासरच्यांनी तिचा गळा आवळण्याचा आणि रॉडने मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर पीडित महिला जुलै २०२३ पासून तिच्या पालकांसोबत राहत आहे. तिने नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आणि बोरीवली न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत न्याय मागितला होता.

याचदरम्यान पतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून तो टेम्पो चालक असल्याचे आणि त्याचे मासिक उत्पन्न ९ हजार असल्याचे सांगितले होते. त्याच्या दाव्यावर दंडाधिकारी व्ही. एफ. चौगुले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दुष्काळाचा ३ टप्प्यांत आढावा; राज्य सरकारकडून मदत; उपाययोजनांना सुरुवात, ५ ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार

हेक्टरी १ लाख मदत, पूर्ण कर्जमाफी द्या : हर्षवर्धन सपकाळ

प्राध्यापकावर कारवाई; IIT मुंबईतील विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी संस्थेने मागितली माफी; गेल्या २० वर्षांत १६० विद्यार्थ्यांची आत्महत्या

ठाण्याला पावसाने झोडपले; राज्यातील अनेक भागांना यलो अलर्ट

काँग्रेसच्या 'ताठ कण्या'चा असाही इतिहास...