Mumbai Dasara Melava 2026 : दसरा मेळावा...शिवाजी पार्कवर आवाज ठाकरेंचाच! संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai Dasara Melava 2026 : दसरा मेळावा...शिवाजी पार्कवर आवाज ठाकरेंचाच!

‘आवाज कुणाचा... शिवसेनेचा’ ही डरकाळी पुन्हा एकदा शिवाजी पार्कवर दसऱ्याच्या दिवशी कानी पडणार आहे. यंदाही २० ऑक्टोबर रोजी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आवाज घुमणार आहे.

Swapnil S

मुंबई : ‘आवाज कुणाचा... शिवसेनेचा’ ही डरकाळी पुन्हा एकदा शिवाजी पार्कवर दसऱ्याच्या दिवशी कानी पडणार आहे. यंदाही २० ऑक्टोबर रोजी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आवाज घुमणार आहे. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी ९ सप्टेंबर रोजी अर्ज दाखल केला होता. देसाई यांच्या अर्जानंतर अन्य कुठल्याही राजकीय पक्षाचा अर्ज प्राप्त न झाल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानावर दसऱ्या मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे जी. उत्तर विभागाकडून सांगण्यात आले.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क मैदानाचे अतूट नाते आहे. गेल्या ६० वर्षांपासून बाळासाहेबांच्या विचारांचे सोने दसरा मेळाव्याला लुटत होते. ३० ऑक्टोबर १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा पार पडला.‌ त्यावेळेपासूनची शिवसेनेची परंपरा आजही कायम आहे. २०१२ मध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची जबाबदारी सांभाळली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर दसऱ्या मेळाव्याचे आयोजन होत आहे. मात्र २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सेनेला सोडचिठ्ठी दिली आणि दोन शिवसेना महाराष्ट्रात आमनेसामने उभ्या टाकल्या आहेत. त्यामुळे २०२२ ते २०२६ पर्यंत मुंबईत दोन्ही शिवसेनेकडून दसऱ्या मेळाव्याचे आयोजन होत आले आहे.

शिवाजी पार्क मैदान दसऱ्या मेळाव्यासाठी मिळावे, यासाठी शिंदे सेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी अर्ज केला होता. परंतु ‘फर्स्ट कम फर्स्ट’ या तत्त्वावर ठाकरे सेनेला दसऱ्या मेळाव्यासाठी परवानगी मिळत आली आहे. यंदा २० ऑक्टोबर २०२६ रोजी दसरा सण आहे. यादिवशी शिवाजी पार्क मैदानावर दसऱ्या मेळाव्याला परवानगी मिळावी, यासाठी ठाकरे सेनेचे खासदार अनिल देसाई यांनी ९ सप्टेंबर रोजी पालिकेच्या जी. उत्तर विभागात अर्ज दाखल केला. अनिल देसाई यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने ठाकरे सेनेला दसऱ्या मेळाव्यासाठी २४ प्रकारच्या अटी-शर्थींनुसार परवानगी देण्यात आल्याचे पालिकेच्या जी. उत्तर विभागाकडून सांगण्यात आले.

या अटी-शर्थींनुसार परवानगी

  • अटी व शर्थींचे उल्लंघन करणार नाही, अशा आशयाचे ५०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणीकृत हमीपत्र सादर करणे

  • सभेला रात्री १० वाजेपर्यंत परवानगी

  • कार्यक्रम संपल्यावर मैदान स्वच्छ व पूर्ववत ठेवणे

  • मैदानाचे नुकसान, गैरवापर, अटी-शर्थीचे उल्लंघन केल्यास २० हजार रुपयांची अनामत रक्कम जप्त करण्यात येईल

  • तसेच मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांचे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र, स्ट्रक्चरल इंजिनिअरचे स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Navi Mumbai : मोठी बातमी! कैलास गायकवाड यांचे निलंबन रद्द; प्रवीण गाडेंची होणार चौकशी, नवी मुंबई महापालिकेचा निर्णय

बारामतीत हवा सुनेत्रा पवारांची; ‘सोमेश्वर’ सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व

चार जणांवर गुन्हे दाखल; पाच दिवसांत २,२९१ अनधिकृत फलक हटवले, महापौरांच्या पुढाकारानंंतर BMC ची विशेष मोहीम

ऊस आंदोलन पेटले; पुणे-बंगळुरू महामार्गावर शेतकऱ्यांचा ठिय्या; वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी; केंद्रीय पथकाच्या आढावा बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डावलले