प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

Mumbai : प्रारूप मतदारयाद्या सोमवारी प्रसिद्ध होणार; ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकतींची संधी, ४ नोव्हेंबरला अंतिम यादी

मुंबईतील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाला आता वेग आला असून, सोमवारी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांतील सर्व विधानसभा मतदारसंघांमधील मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाच्या प्रस्तावाला भारत निवडणूक आयोगाने २४ ऑगस्ट रोजी मंजुरी दिली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाला आता वेग आला असून, सोमवारी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांतील सर्व विधानसभा मतदारसंघांमधील मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाच्या प्रस्तावाला भारत निवडणूक आयोगाने २४ ऑगस्ट रोजी मंजुरी दिली आहे.

प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत मतदारांना दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात हे दावे-हरकती स्वीकारले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यालयांचे पत्ते मुंबई महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

मुंबईतील नागरिकांनी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची तपासणी करावी. नाव नसल्यास किंवा काही त्रुटी आढळल्यास ३० सप्टेंबरपूर्वी संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात दावे-हरकती दाखल करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.

नाव वगळलेल्यांना संधी

प्रारूप मतदार यादीमध्ये एखाद्या मतदाराचे नाव समाविष्ट नसल्यास किंवा मतदार यादीतून नाव वगळले गेले असल्यास संबंधित नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी नमुना क्रमांक ६ भरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करता येणार आहे. १ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांनाही या पुनरीक्षण प्रक्रियेत मतदार म्हणून नाव नोंदविता येणार आहे. त्यांनाही नमुना क्रमांक सहा भरून आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागतील.

विसंगती असलेल्या मतदारांची सुनावणी

प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अनमॅप्ड आणि विसंगती असलेले मतदार तसेच दावे-हरकती दाखल करणाऱ्या मतदारांना संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामार्फत नोटिसा बजावण्यात येणार आहेत. त्यानंतर सुनावणी घेऊन संबंधित दावे व हरकतींचा निर्णय घेतला जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेनंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नेपाळमध्ये पुन्हा महापुराची भीती! मृतांचा आकडा ५४७ वर; ३२० भारतीय बेपत्ता; ४०० जण तिबेटच्या सीमेवर अडकले

Nepal Floods : राज्यातील ६० पर्यटकांशी अद्याप संपर्क नाही; २९० जण सुरक्षित, १०५ जण भारताच्या दिशेने रवाना

Maratha Reservation : मागण्या न मानल्यास 'वर्षा'समोर आंदोलन; मनोज जरांगेंचा इशारा, आजपासून उपोषण

Jalna : ब्राह्मण समाजातर्फेही आजपासून उपोषण

Mumbai : दूध १०२ रुपये लिटर; घाऊक दरात ९ रुपये वाढ; १ सप्टेंबरपासून सुटे दूध महागणार