Mumbai : पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्ग होणार खड्डेमुक्त; मॅस्टिक डांबरचा वापर, पालिका करणार ५० कोटींचा खर्च 
मुंबई

Mumbai : पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्ग होणार खड्डेमुक्त; मॅस्टिक डांबरचा वापर, पालिका करणार ५० कोटींचा खर्च

मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी शहर व दोन्ही उपनगरातील खड्डे बुजवण्यासाठी ४२ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी शहर व दोन्ही उपनगरातील खड्डे बुजवण्यासाठी ४२ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. तर पूर्व द्रुतगती महामार्ग, मुक्त महामार्ग व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी ५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवारी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गांवरील खड्डे आणि रस्त्यांची खराब स्थिती सुधारण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग आणि मुक्तमार्गावरील खड्डे तसेच खराब झालेल्या भागांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे तर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील मुख्य मार्ग आणि सेवा रस्त्यांवरील खड्ड्यांची ‘मॅस्टिक’ पद्धतीने दुरुस्ती करण्यासाठी २५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. दरम्यान, मॅस्टिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास रस्त्यांची टिकाऊपणा वाढतो आणि पावसाळ्यात खड्डे निर्माण होण्याची शक्यता कमी होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. खड्डेमुक्त रस्त्यांमुळे वाहनचालक तसेच प्रवाशांनाही दिलासा मोठा दिलासा मिळणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या दुरुस्तीचा मुद्दा चर्चेत येत असतो. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो तसेच वाहतूककोंडी आणि अपघातांची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर, पालिकेने नागरिकांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

७ मे रोजी निविदा अंतिम होईल. निविदा प्रक्रियेनंतर संबंधित पात्र कंत्राटदारांची नियुक्ती करून कामे लवकरात लवकर सुरू केली जाणार आहेत. विशेषतः पावसाळ्याच्या आधी ही कामे पूर्ण करण्यावर भर दिल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत रस्ते प्रवास करताना पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होते. अशा वेळी त्यात अवजड वाहनांचाही मोठा भरणा असतो. त्यामुळे पावसाळ्यात वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे खड्डे पडतात.

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...