Mumbai : २१ स्टॉल केले जमीनदोस्त; मानखुर्द, गोवंडीत अतिक्रमणविरोधी मोहीम, पालिकेच्या एम-पूर्व विभागाची कारवाई संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : २१ स्टॉल केले जमीनदोस्त; मानखुर्द, गोवंडीत अतिक्रमणविरोधी मोहीम, पालिकेच्या एम-पूर्व विभागाची कारवाई

मुंबईतील फुटपाथ पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून मानखुर्द गोवंडी परिसरातील फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील फुटपाथ पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून मानखुर्द गोवंडी परिसरातील फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या एम पूर्व विभागाने केलेल्या कारवाईत २१ जमीनदोस्त करण्यात आली. स्टॉलवर हातोडा हाणला असून फुटपाथवरील बेकायदा बांधकामे मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार पादचारी प्रथम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मुंबई महापालिकेच्या २६ विभागीय क्षेत्रात अतिक्रमणमुक्त फुटपाथ ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत एम पूर्व विभागात परिमंडळ ५ च्या सहआयुक्त संध्या नांदेडकर, 'एम/पूर्व' विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाने यांच्या मार्गदर्शनाखाली 'एम/पूर्व' विभागातील मानखुर्द व गोवंडी रेल्वे स्थानक परिसरातील अंदाजे २५०० मीटर लांबीच्या पदपथांवर 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली.

या कारवाईमुळे पदपथ अडथळामुक्त, स्वच्छ व सुरक्षित करून पदचाऱ्यांसाठी सुलभ मार्ग उपलब्ध करून देण्यात आले असून पादचारी प्रथम हे अभियान यापुढे ही सुरुच राहणार असल्याचे सहाय्यक आयुक्त अलका ससाने यांनी सांगितले.

अशी झाली कारवाई

  • स्टॉलवर कारवाई - २१

  • वाढीव बेकायदा बांधकामे - ५

  • बेवारस वाहने - ९

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maratha Reservation : मराठ्यांचे वादळ धडकणार; 'मुंबईत जाणारच' जरांगेंची घोषणा, १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानात उपोषण

BRICS Summit 2026 : पहलगाम हल्ल्याचा 'ब्रिक्स'कडून निषेध; 'नवी दिल्ली घोषणापत्र' स्वीकारले

गणेशभक्तांच्या वाटेत वाहतूककोंडीचे विघ्न; माणगावजवळ आठ किमीच्या रांगा, मुंबई ते मालवण २२ तास

आजचे राशिभविष्य, १३ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मंगळागौरीसाठी अनुष्का सरकटेचा मराठमोळा साज; पोपटी नऊवारीत खुललं सौंदर्य