Mumbai : घरासाठी गिरणी कामगारांचे आंदोलन; भारतमाता सिनेमा गृहासमोर सोमवारी देणार ठिय्या प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : घरासाठी गिरणी कामगारांचे आंदोलन; भारतमाता सिनेमा गृहासमोर सोमवारी देणार ठिय्या

गिरणी कामगारांना मुंबईतच घर हवे असून सरकारने प्राधान्याने याचा विचार करावा, या मागणीसाठी गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने सोमवारी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लालबाग-भारत मातासिनेमा येथे कामगारांचे ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : गिरणी कामगारांना मुंबईतच घर हवे असून सरकारने प्राधान्याने याचा विचार करावा, या मागणीसाठी गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने सोमवारी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लालबाग-भारत मातासिनेमा येथे कामगारांचे ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात शेकडो कामगारांसह अनेक नेतेही सहभागी होणार आहेत.

विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण विभागाचे अप्पर सचिव असीम गुप्ता यांच्या सचिवस्तरावरील झालेल्या बैठकीत मुंबईत बांधलेल्या घरांची सोडत, संक्रमण शिबिरातील घरे, एकत्रीत भूखंडावरील घरांचा ताबा, झोपडपट्टी पुनर्वसनात घरे, गिरण्यांच्या चाळींच्या पुनर्वसनातून घरे इत्यादी अनेक निर्णयातून मुंबईत मोठ्या प्रमाणात घरे निर्माण होण्याची सकारात्मक चर्चा झाली आहे.

सरकारने निर्णयाचा फेरविचार करून मुंबईत घरे उभारणीला प्राधान्य देऊ, अशी घोषणा करावी. ही मागणी भारतमातावरील ठिय्या आंदोलनात करण्यात येणार आहे. आंदोलनात निमंत्रक गोविंदराव मोहिते, निवृत्ती देसाई, काँ.विजय कुलकर्णी, बाळ खवणेकर, हेमंत गोसावी, रमाकांत बने आदी सहभागी होतील.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्यात हवामान बदलणार; दिवसा उन्हाचा चटका, रात्री थंडीचा कडाका; IMD चा मोठा अंदाज

'पॅन' अन् 'मतदार कार्ड' नागरिकत्वाचा पुरावा नाही; गुवाहाटी उच्च न्यायालयाने फेटाळला दावा

देवेंद्र फडणवीस-तटकरे भेट; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोरात

मुंबईतील ४३ बेकऱ्यांना BMC ने टाळे ठोकले; स्वच्छ इंधनाचा वापर न केल्याने परवाने रद्द

मदर डेअरी, अमूल दूध महागले; प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू