Mumbai : कौटुंबिक वादातून पत्नीची निर्घृण हत्या; आरोपी पती अटकेत, पोलीस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटरवर घडली घटना 
मुंबई

Mumbai : कौटुंबिक वादातून पत्नीची निर्घृण हत्या; ओशिवरा पोलीस ठाण्याच्या शेजारीच थरार

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमी महिलेला तातडीने कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : अंधेरी पश्चिमेतील ओशिवरा पोलीस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर मंगळवारी (दि. १५) सायंकाळी कौटुंबिक वादातून एका पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून त्यानंतर चाकूने गळा चिरून तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी काही तासांतच अटक केली.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित दाम्पत्य भीक मागून उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता दोघांमध्ये वाद झाला. प्राथमिक तपासात दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, याबाबतचा अंतिम अहवाल अद्याप आलेला नाही.

वाद विकोपाला, पत्नीचा घेतला जीव

पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात पत्नीच्या डोक्यात दगड घालून, त्यानंतर चाकूने गळा चिरत तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमी महिलेला तातडीने कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

आरोपी अटकेत, तपास सुरू

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत आरोपी पतीला अटक केली. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हत्येमागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रमाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Local Mega Block : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द, एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका

मुंबईत उष्माघाताचा धोका; दुपारी ११ ते २ प्रकल्प कामे बंद ठेवा, नगरसेविकेचे महापालिका आयुक्तांना पत्र

'देव त्यांचं भलं करो'; तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांचा मुलगा मल्हारने सोडलं मौन

Mumbai : अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर BMC चा हातोडा! अनधिकृत बांधकामावर कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका