Mumbai : धावत्या लोकलमध्ये चढताना महिलेचा तोल गेला अन्...; रेल्वे कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वाचला जीव; कुर्ला स्टेशनवरील CCTV व्हायरल  
मुंबई

Mumbai : धावत्या लोकलमध्ये चढताना महिलेचा तोल गेला अन्...; रेल्वे कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वाचला जीव; कुर्ला स्टेशनवरील CCTV व्हायरल

दुपारी सुमारे १२.३० वाजता कुर्ला स्थानकावर लोकल आली. प्रचंड गर्दीमुळे एका महिलेने धावत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाज्यात चढतानाच...

Mayuri Gawade

मुंबई लोकलमध्ये क्षणभराची चूक किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय कुर्ला स्थानकावर आला. धावत्या गाडीत चढण्याच्या प्रयत्नात एका महिलेचा तोल जाऊन ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधोमध पडणार होती. मात्र त्याचवेळी प्रसंगावधान राखत एका रेल्वे कर्मचाऱ्याने धाव घेतली आणि त्या महिलेला वाचवले. हा थरारक प्रसंग स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता कुर्ला स्थानकावर लोकल आली. प्रचंड गर्दीमुळे एका महिलेने धावत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाज्यात चढतानाच तिचा तोल गेला. ती ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या मधोमध पडणार, त्याचवेळी सुदैवाने ड्युटीवर असलेले जॉन पॉल (CCTC, कुर्ला) जवळून जात होते. त्यांनी हे बघताच प्रसंगावधान राखत तत्काळ धाव घेत महिलेला सुरक्षित बाहेर खेचलं. क्षणभराचा उशीरही त्या महिलेच्या जीवावर बेतला असता.

रेल्वे प्रशासनाकडून कौतुक

मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांनी 'एक्स'वर पोस्ट करत जॉन पॉल यांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हंटलं, "जॉन पॉल यांनी दाखवलेलं धैर्य आणि तत्परता वाखाणण्याजोगी आहे." जीव वाचवल्यामुळे संबंधित महिलेनेही जॉन पॉल यांचे आभार मानले आहेत, तर रेल्वे प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे.

मुंबई लोकल ही शहराची लाईफलाईन जरी असली तरी अशा निष्काळजीपणामुळे जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाने स्वतःची जबाबदारी ओळखणं अत्यंत गरजेचं आहे.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार