Mumbai : लाइफ गार्ड ३ ते ४ किमीचा एरिया कव्हर करणार; चौपाट्यांवर १२६ लाइफ गार्ड, अतिरिक्त आयुक्तांची स्थायी समितीत माहिती  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : लाइफ गार्ड ३ ते ४ किमीचा एरिया कव्हर करणार; चौपाट्यांवर १२६ लाइफ गार्ड, अतिरिक्त आयुक्तांची स्थायी समितीत माहिती

चौपाट्यांवर मुंबईकर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाइफ गार्ड तैनात करण्यात येतात. यंदा १२६ लाइफ गार्ड विविध समुद्रकिनारी चौपाट्यांवर तैनात करण्यात येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : चौपाट्यांवर मुंबईकर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाइफ गार्ड तैनात करण्यात येतात. यंदा १२६ लाइफ गार्ड विविध समुद्रकिनारी चौपाट्यांवर तैनात करण्यात येणार आहेत. हे लाइफ गार्ड ३ ते ४ किमीचा एरिया कव्हर करतात, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

चौपाट्यांवर लाइफ गार्ड तैनात करण्याचे कंत्राट जून २०२५ मध्ये संपुष्टात आले. प्रस्ताव आणण्यास एक वर्ष उशीर झाला, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, असा सवाल भाजपचे नगरसेवक स्थायी समिती सदस्य तेजिंदर तिवाना यांनी उपस्थित केला. नगरसेवक नसताना प्रस्ताव मंजूर केला अशी शंका स्थायी समिती सदस्य यशोधर फणसे यांनी उपस्थित केली. निविदेची मुदत संपण्याआधी प्रस्ताव का आणला नाही, असे काँग्रेसचे गटनेते अश्रफ आजमी म्हणाले.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रस्ताव मंजूर

लाइफ गार्ड यांची नियुक्ती करण्यासाठी साहित्यसह निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. दोन एजन्सीनी प्रतिसाद दिला. त्यामुळे जुन्या कंत्राटदाराला नवीन कंत्राटदार येईपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी सूचना अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी दिली. अखेर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रस्ताव मंजूर केल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले.

ऐन दिवाळीत मुंबईकरांचा लोकल प्रवास रखडणार! मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावरील लोकल रद्द, वाचा महत्त्वाचे अपडेट्स

Maharashtra Board Exam 2027 : दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर! कोणता पेपर कधी? जाणून घ्या एका क्लिकवर

Mumbai : दरवाजात उभं राहण्यावरून वाद अन् हाणामारी! चर्चगेट-विरार लोकलमधून प्रवासी थेट फलाटावर पडला, Video

Mumbai : धारावी मलजल प्रक्रिया प्रकल्पाचे ७६ टक्के काम पूर्ण; मे २०२७ पर्यंत उभारणीचे लक्ष्य

पत्नी अन् दोन मुलं असतानाही मित्राच्या मुलीला लग्नाची मागणी; २० वर्षीय तरुणीनं नकार देताच उचललं टोकाचं पाऊल