Mumbai : तिकीटविना प्रवास करणाऱ्यांवर रेल्वेची धडक कारवाई! घाटकोपर स्थानकात ३९५ प्रवाशांना दणका, १ लाखांहून अधिक दंड वसूल 
मुंबई

Mumbai : विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वेची धडक कारवाई! घाटकोपर स्थानकात ३९५ प्रवाशांना दणका, १ लाखांहून अधिक दंड वसूल

संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी घाटकोपर स्थानकावर राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत तिकीटविना प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. मध्य रेल्वेने एका दिवसात तब्बल ३९५ प्रवाशांना पकडत १ लाखांहून अधिक दंड वसूल केला. मुंबईत तिकीटविना प्रवासाच्या वाढत्या घटनांमुळे रेल्वे प्रशासनाने आता कारवाईचा वेग वाढवला आहे.

Mayuri Gawade

मुंबई : मध्य रेल्वेकडून तिकीटविना प्रवास करणाऱ्यांविरोधात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली असून, घाटकोपर स्थानकात संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत मोठी कारवाई करण्यात आली. या मोहिमेत ३९५ तिकीटविना प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, एकाच दिवशी १,०२,२६० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मध्य रेल्वेच्या डीआरएम कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही विशेष मोहीम मंगळवार, १८ मार्च रोजी संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत राबवण्यात आली. या दरम्यान व्यापक तपासणी करून मोठ्या प्रमाणात तिकीटविना प्रवासी आढळले.

घाटकोपर स्थानकाचे महत्त्व

घाटकोपर स्थानक हे मुंबईतील महत्त्वाचे स्थानक मानले जाते. मेट्रो १ मुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरील प्रवाशांची येथे मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. त्यामुळे हे स्थानक प्रमुख प्रवासी केंद्र ठरले आहे.

मुलुंडमध्येही कारवाई

दरम्यान, त्याच दिवशी मुलुंड स्थानकातही अशाच प्रकारची मोहीम राबवण्यात आली. येथे ३१५ तिकीटविना प्रवाशांवर कारवाई करून ७४,८६० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कारवाईची व्याप्ती वाढली

मुंबईत अलीकडच्या काळात तिकीटविना प्रवासाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने विविध स्थानकांवर विशेष तपासणी मोहिमा राबवण्यात येत आहेत. दररोज शेकडो प्रवासी या कारवायांमध्ये सापडत आहेत.

इतर स्थानकांवरही मोहीम

१६ आणि १७ मार्च रोजी आसनगाव, टिटवाळा, अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकांवर विशेष मोहीम राबवण्यात आली. आसनगाव येथे ३१२ प्रवाशांकडून ७८,२९० रुपये, तर टिटवाळा येथे ३०५ प्रवाशांकडून ७५,३४५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

तसेच १६ मार्च रोजी अंबरनाथ आणि बदलापूर येथे संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत राबवलेल्या मोहिमेत ७६३ तिकीटविना प्रवासी आढळले असून, एकूण १,८८,६२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यापूर्वी वाशी रेल्वे स्थानकातही अशाच मोहिमेत ३९३ प्रवाशांवर कारवाई करून एका दिवसात १,०२,२६० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.

व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली; बचावकार्य युद्धपातळीवर, दूतावासाकडून हेल्पलाइन सुरू

PF खातेधारकांनो लक्ष द्या! UAN सक्रिय नसेल तर EPFO च्या अनेक सुविधा वापरता येणार नाहीत; 'या' स्टेप्स फॉलो करा

बेसमेंटमध्ये विवस्त्र अवस्थेत आढळला ७ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह; अत्याचारानंतर हत्येचा आरोप

Swiggy Instamart अडचणीत; मुदत संपलेल्या आणि खराब झालेल्या अन्नपदार्थांच्या तक्रारींवर FSSAI ची कारवाई

प्रायव्हसीवरून वाद वाढताच मेटाचा यू-टर्न! इंस्टाग्रामवरील 'Muse Image' AI फीचर बंद