Mumbai : मयंक लोहार हत्याकांडानंतर माहीममध्ये आणखी एका तरुणावर चाकूहल्ला; आरोपी फरार 
मुंबई

Mumbai : मयंक लोहार हत्याकांडानंतर माहीममध्ये आणखी एका तरुणावर चाकूहल्ला; आरोपी फरार

गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील अंधेरी ते बोरिवली लोकलमध्ये एका तरुणाची किरकोळ वादातून हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच मुंबईतील माहीम रेल्वे स्टेशनवर एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Krantee V. Kale

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील अंधेरी ते बोरिवली लोकलमध्ये एका तरुणाची किरकोळ वादातून हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच मुंबईतील माहीम रेल्वे स्टेशनवर एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार माहीम स्टेशनबाहेर किरकोळ धक्काबुक्कीतून हा वाद निर्माण झाला. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने चाकू काढून तरुणावर हल्ला केला. या तरुणाचे नवीन प्रसन्ना असून तो ३५ वर्षांचा आहे. नवीन हा माहिम पश्चिम परिसरातील पितांबर लेनमधील रहिवाशी आहे.

अज्ञात हल्लेखोराला नवीनचा धक्का लागला व त्याचा मोबाईल फोन पडला. यानंतर नवीनने सॉरी म्हटलं तरीही त्याला राग अनावर झाला. त्याने शिवीगाळ करत तरुणाचा स्टेशनबाहेरपर्यंत पाठलाग केला. त्यानंतर चाकू काढून त्याने नवीनवर हल्ला केला. या हल्ल्यात नवीन जखमी झाला असून त्याला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मारेकरी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबईत 'कॅच द कल्प्रीट ऑन कॅमेरा' मोहीम सुरू; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे फोटो पाठवण्याचे आवाहन

Mumbai : हुंडाबळी, आत्महत्या घटल्या; मात्र, छळाच्या घटनांमध्ये झाली वाढ

प्रवाशांचे सामान, दागिने चोरीचे प्रमाण वाढले; मुंबई विमानतळावरील पोलिसांचे तपासाचे आव्हान कायम

भाजपच्या सर्वच नगरसेवकांची कानउघाडणी; सभागृहातील गदारोळ, सत्ताधारी-विरोधक संघर्ष

राहुल गांधींची कॉपी करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न फसला! सपकाळ यांची टीका