Mumbai : मुलींचे गुपचूप व्हिडिओ काढत होता; रंगेहात पकडून दिला चांगलाच चोप, संतप्त नागरिकाने केले पोलिसांच्या हवाली, Video  
मुंबई

Mumbai : मुलींचे गुपचूप व्हिडिओ काढत होता; रंगेहात पकडून दिला चांगलाच चोप, संतप्त नागरिकाने केले पोलिसांच्या हवाली, Video

मुंबईतील खार सबवे परिसरात मुलींचे गुपचूप व्हिडिओ काढत असलेल्या एका तरुणाला नागरिकाने रंगेहात पकडले. संतप्त नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

Mayuri Gawade

मुंबई : मुंबईतील खार सबवे परिसरात महिलांचे गुपचूप चित्रीकरण करत असलेल्या एका तरुणाला नागरिकांनी पकडून चोप दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा संताप व्यक्त केला जात असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गपचूप मुलींचे व्हिडिओ काढत होता म्हणून...

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका नागरिकाने चित्रीत करून शेअर केला आहे. संबंधित नागरिक खार सबवे परिसरातील गजबजलेल्या रस्त्यावरून जात असताना एका तरुणाचे संशयास्पद वर्तन त्याच्या लक्षात आले. काही वेळ निरीक्षण केल्यानंतर त्या तरुणाने रस्त्याने जाणाऱ्या मुलींचे मोबाईल फोनद्वारे गुपचूप व्हिडिओ चित्रीकरण करत असल्याचे लक्षात आले.

सार्वजनिक ठिकाणी फैलावर घेत कानशिलातही लगावली

ही बाब लक्षात येताच संबंधित नागरिकाने त्या तरुणाला तात्काळ जाब विचारला. तो तरुण उत्तर प्रदेशचा स्थलांतरित कामगार असून रोजगारासाठी मुंबईत आला होता. या कृत्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकाने त्याला सार्वजनिक ठिकाणी फैलावर घेत कानशिलातही लगावली. तसेच त्याचा मोबाईल तपासल्यानंतर महिलांचे चित्रीकरण केलेले व्हिडिओ आढळले. ही घटना पाहण्यासाठी परिसरातील अनेक जण रस्त्यावर थांबले आणि काही काळ गर्दी झाली.

चोप देत पोलिसांच्या हवाली

यानंतर संबंधित नागरिकाने त्या तरुणाला चोप दिल्यानंतर पकडून थेट खार पोलिस ठाण्यात नेले आणि मोबाईलमधील पुरावे पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडिओ व्हायरल; महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरभर महिलांच्या हक्कांबाबत आणि सुरक्षिततेबाबत विविध कार्यक्रम आयोजित केले जात असताना ही घटना समोर आल्याने सार्वजनिक ठिकाणांवरील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सोशल मीडियावर अनेकांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत महिलांना रोजच्या प्रवासात अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते, असे नमूद केले. काहींनी संबंधित नागरिकाच्या हस्तक्षेपाचे कौतुकही केले आहे.

UPI व्यवहारांवरील MDR शुल्काला तूर्तास ब्रेक! सणासुदीत NPCI चा मोठा निर्णय, आता कधीपासून मोजावे लागणार पैसे?

Nalasopara : लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; आणखी ७० ते ८० महिलांच्या शोषणाचाही आरोप

Punjab : फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच गोळीबार; ड्रग्सविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची हत्या, Video

मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम

Cyber Scam : व्हॉट्सॲपवर आलेल्या 'त्या' मेसेजला 'NO' रिप्लाय करताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांचा इशारा