Mumbai : मानखुर्दमध्ये दुर्घटना; सहा जणांचा मृत्यू 
मुंबई

Mumbai : मानखुर्दमध्ये दुर्घटना; सहा जणांचा मृत्यू

मानखुर्द येथील जनतानगर परिसरात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास तळ अधिक तीन मजली चाळीचा काही भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली.

Swapnil S

मुंबई : मानखुर्द येथील जनतानगर परिसरात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास तळ अधिक तीन मजली चाळीचा काही भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत सहा ज णांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. मृत आणि जखमींची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मानखुर्द येथील जनता नगर येथील हनुमान मंदिरामागे असलेल्या चाळ क्रमांक ५ मधील दोन ते तीन घरांचा भाग अचानक कोसळला. दुर्घटनेनंतर अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, मुंबई महानगरपालिकेचे एम/पूर्व विभागाचे कर्मचारी तसेच १०८ रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

बचाव पथकाने युद्धपातळीवर शोध आणि बचाव मोहीम सुरू केली. शताब्दी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला पाच जखमींना (चार महिला व एक पुरुष) रुग्णालयात आणण्यात आले. त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कृत्रिम फुलांना पसंतीची मोहोर; चिनी बनावटीच्या फुलांना पसंती, क्रॉफर्ड मार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड

Mumbai : विद्यार्थ्यांनी घडवल्या पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती; ‘फ्री प्रेस हाऊस’मध्ये भरला नवकलाकारांचा मेळा

Mumbai : ब्रीच कँडीकरांचा ‘बीएमसी फुटपाथ रिपोर्ट कार्ड’; ‘कारवाईची नोंद व जबाबदारी निश्चित करा, रहिवाशांची मागणी

BRICS Summit 2026 : ‘ब्रिक्स’ साठी जिनपिंग दिल्लीत येणार

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : रमेश म्हात्रेसह इतरांवर न्यायालयात आरोपपत्र