Mumbai : मराठी पाट्या न लावणाऱ्या १०२३ आस्थापनांना नोटीस; ३३ हजारांहून अधिक आस्थापनांची झाडाझडती  
मुंबई

Mumbai : मराठी पाट्या न लावणाऱ्या १०२३ आस्थापनांना नोटीस; ३३ हजारांहून अधिक आस्थापनांची झाडाझडती

मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे, असे वारंवार सांगूनही दुर्लक्ष करणे मुंबईतील दुकाने व आस्थापनांच्या अंगलट आले आहे. विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी मुंबईतील ३३,७५७ दुकाने व आस्थापनांची झाडाझडती घेतली आहे. मराठी पाट्या न लावणाऱ्या आस्थापनांना १२ दिवसांत १०२३ आस्थापनांना मुंबई मनपाने ‘ऑन दी स्पॉट नोटीस’ बजावली आहे.

Swapnil S

मुंबई : मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे, असे वारंवार सांगूनही दुर्लक्ष करणे मुंबईतील दुकाने व आस्थापनांच्या अंगलट आले आहे. विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी मुंबईतील ३३,७५७ दुकाने व आस्थापनांची झाडाझडती घेतली आहे. मराठी पाट्या न लावणाऱ्या आस्थापनांना १२ दिवसांत १०२३ आस्थापनांना मुंबई मनपाने ‘ऑन दी स्पॉट नोटीस’ बजावली आहे.

दीक्षा कारकर यांनी कठोर भूमिका घेताच २७ हजार ३९४ दुकाने व आस्थापनांवर मराठी पाट्या झळकल्या. दरम्यान, टप्प्याटप्प्याने मराठी पाट्या झळकतील यासाठी कार्यवाही सुरू असून पुढील टप्प्यात मुंबईतील उद्योग असतील, असे कारकर यांनी सांगितले

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी भाषेत, देवनागरी लिपित ठळक अक्षरात दिसतील, असे नामफलक लावणे बंधनकारक आहे. मात्र मुंबईत ५,०२० आस्थापनांनी मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. ज्या आस्थापनावर मराठी भाषेत पाट्या नसतील. त्यांच्यावर पाहणी करून तत्काळ नोटीस बजावा, असे निर्देश दीक्षा कारकर यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.

१४ ते २७ मे या काळात मुंबई महापालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालय ते विविध विभाग कार्यालय क्षेत्रात असलेल्या दुकाने व आस्थापनांची झाडाझडती घेण्यास दीक्षा कारकर यांनी सुरुवात केली. धाडसत्रामध्ये मुख्यत्वे महत्त्वाचे रस्ते, मुख्य रस्ते येथील दर्शनी भागात असलेल्या आस्थापनाची पाहणी करून ज्या ज्या आस्थापनांनी मराठी भाषेत नामफलक लावलेली नाहीत अशा आस्थापनाधारकाविरुद्ध महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमांतर्गत योग्य ती कारवाई करण्यात आल्याचे दीक्षा कारकर यांनी सांगितले.

अशी झाली कारवाई

एकूण भेटी दिलेल्या आस्थापना - ३३,७५७

मराठी भाषेत नामफलक नसलेल्या आस्थापना - १,०२३

१३ जूनपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर मोहिमेचा दुसरा टप्पा चालू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यापूर्वी पहिल्या टप्पात किती आस्थापनांना भेट दिली. कारवाईचा किती फरक पडला या सगळ्या गोष्टींचा आढावा बैठक घेऊन आयुक्तांसोबत पुढच्या बैठकीचे आयोजन केले जाणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
दीक्षा कारकर, विधी समिती अध्यक्षा

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके