Mumbai : सोमवार ठरला घातवार; मरीन ड्राईव्हवर भीषण अपघातात तिघांचा बळी 
मुंबई

Mumbai : सोमवार ठरला घातवार; मरीन ड्राईव्हवर भीषण अपघातात तिघांचा बळी

पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरात सोमवारी पहाटे रक्ताचा सडा पडला.

Swapnil S

मुंबई : पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरात सोमवारी पहाटे रक्ताचा सडा पडला. अतिवेगामुळे झालेल्या एका भीषण अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाला आपल्या प्राणास मुकावे लागले असून, त्यांना धडक देणाऱ्या दुचाकीवरील तरुण आणि तरुणीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मरीन ड्राइव्ह येथे एका वेगवान दुचाकीने पादचाऱ्याला धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही दुर्घटना पहाटे ५.४० च्या सुमारास एन. एस. रोडवरील ‘पारसी जिमखाना’ जंक्शन सिग्नलवर घडली. दुचाकीस्वार आपली मोटारसायकल अत्यंत बेजबाबदारपणे चालवत होता आणि त्याच्यासोबत एक महिला मागे बसलेली होती. दुचाकीस्वाराने सिग्नलकडे दुर्लक्ष केले आणि पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघांसह तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मुंबई पोलीस या घटनेचा तपास करत असून अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला, याचा संपूर्ण तपशील समोर आलेला नाही.

अपघातामुळे वर्दळीच्या मार्गावरील वाहतुकीत थोडा व्यत्यय आला, त्याचवेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला. घटनेचा नेमका क्रम आणि अतिवेग व सिग्नल उल्लंघनामुळे हा प्राणघातक अपघात झाला का, याची तपासणी पोलीस अधिकारी करीत आहेत.

पहाटे नेमकं काय घडलं?

मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर अनेक नागरिक मॉर्निंग वॉकला येत असतात. त्याचप्रमाणे एक वृद्ध व्यक्ती मॉर्निंग वॉकला आले होते. त्यावेळी बेदरकारपणे भरधाव आलेल्या एका दुचाकीची धडक या वृद्धाला लागली. तसेच, इतर दोन स्कुटींनाही ही दुचाकी धडकली. या तिहेरी अपघातात दुचाकीवरील दोघे अन् पादचारी व्यक्ती गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथकाने जखमींना जवळच्या जी. टी. रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारांआधीच या तिघांचाही मृत्यू झाला. एन.एस रोडच्या उत्तर दिशेकडील मार्गावर पहाटे ५:४० च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मृतांमध्ये किशोर पांडुरंग लामणे (वय ६६) हे पादचारी (रहिवासी: एकता को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, गिरगाव), कृष्णा उदय देसाई (वय १९) दुचाकीस्वार चांदनी इमामअली शेख (वय १८) दुचाकीवर कृष्णाच्या मागे बसलेली तरुणी यांचा समावेश आहे.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके