नोंदणीकृत डबेवाल्यांना उपचारासाठी मदत; महापौर वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदतीचा हात  X| mybmc
मुंबई

नोंदणीकृत डबेवाल्यांना उपचारासाठी मदत; महापौर वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदतीचा हात

डबेवाला संघटनेने मांडलेल्या मागण्या मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिली. तसेच, नोंदणीकृत डबेवाल्यांना वैद्यकीय उपचारांसाठी महापौर वैद्यकीय सहायता निधीतून रुपये २५ हजार मदत तत्काळ प्रदान करण्यात येईल, अशी घोषणाही महापौरांनी केली आहे.

Swapnil S

मुंबई : डबेवाला संघटनेने मांडलेल्या मागण्या मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिली. तसेच, नोंदणीकृत डबेवाल्यांना वैद्यकीय उपचारांसाठी महापौर वैद्यकीय सहायता निधीतून रुपये २५ हजार मदत तत्काळ प्रदान करण्यात येईल, अशी घोषणाही महापौरांनी केली आहे.

मुंबई डबेवाला संघटना (मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्स असोसिएशन) शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांसंदर्भात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात सोमवारी भेट घेतली. त्यावेळी महापौरांनी घोषणा केली.

यावेळी आमदार श्रीकांत भारतीय, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवाडकर, तसेच नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके आणि डबेवाला संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

डबेबाला भवन निशुल्क करण्याची मागणी

वांद्रे (पश्चिम) येथील रिझवी महाविद्यालय परिसरात असलेले डबेवाला भवन अर्थात मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र हे महानगरपालिकेने निःशुल्क करून द्यावे, डबेवाला भवनासाठी आत्तापर्यंत महानगरपालिकेकडून आकारण्यात आलेले सर्व भाडे विशेष बाब म्हणून पूर्णपणे माफ करण्यात यावे, डबेवाला भवन परिसरातील रस्त्यास संघटनेचे संस्थापक कै. महादू हावजी बच्चे यांचे नाव देण्यात यावे, मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांजवळ डबेवाल्यांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित सायकल पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, चर्चगेट रेल्वे स्थानकासमोरील ऐतिहासिक स्थळाचा मुंबई डबेवाला पर्यटक केंद्र म्हणून विकास करण्यात यावा, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग