महापौरांच्या पत्रामुळे नव्या वादाला तोंड; शैक्षणिक सल्लागाराच्या नियुक्तीसाठी शिक्षण समिती अध्यक्षांना पत्र संग्रहित छायाचित्र
मुंबई

महापौरांच्या पत्रामुळे नव्या वादाला तोंड; शैक्षणिक सल्लागाराच्या नियुक्तीसाठी शिक्षण समिती अध्यक्षांना पत्र

महापौर बंगल्याच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च, महापौरांच्या वाहनांवर लुकलुकणारे दिवे, सोशल मीडियावर २५ लाखांचा खर्च या विविध मुद्द्यांवर महापौर रितू तावडे यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Swapnil S

मुंबई : महापौर बंगल्याच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च, महापौरांच्या वाहनांवर लुकलुकणारे दिवे, सोशल मीडियावर २५ लाखांचा खर्च या विविध मुद्द्यांवर महापौर रितू तावडे यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात महेश ट्युटोरियलचे संचालक डॉ. श्रेणिक कोटेचा यांची मुंबई महापालिकेच्या शाळांमधील नव्या शैक्षणिक उपक्रमांसाठी मानद सल्लागार म्हणून नियुक्ती करा, असे पत्र महापौरांनी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांना लिहिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी पुन्हा एकदा प्रशासकीय प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याची चर्चा रंगू लागली आहे. शिक्षणतज्ज्ञ व सार्वजनिक धोरण सल्लागार डॉ. श्रेणिक कोटेचा यांची मुंबई महापालिकेच्या शाळांमधील नव्या शैक्षणिक उपक्रमांसाठी मानद सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस करत महापौरांनी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांना पत्र पाठविले आहे. या पत्रामुळे महापालिका वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.

महापौरांनी पाठविलेल्या पत्रात डॉ. कोटेचा हे राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या स्टिअरिंग कमिटीचे सदस्य असून शिक्षण क्षेत्रातील त्यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांची नियुक्ती करण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे.

महापालिकेच्या शाळांमधील सल्लागार किंवा तज्ज्ञांची नियुक्ती करण्यासाठी ठराविक प्रशासकीय प्रक्रिया, पात्रता निकष आणि निवड पद्धती असताना एखाद्या व्यक्तीच्या अर्जाच्या आधारे थेट शिफारस करण्याची गरज काय होती, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

पत्र बनावट - रितू तावडे

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नवीन शैक्षणिक उपक्रमांसाठी मानद सल्लागार म्हणून डॉ. श्रेणिक कोटेचा नामक व्यक्तीची नियुक्ती करावी, या आशयाचे कथित पत्र महापौर कार्यालयातून आवक-जावक झालेले नाही, ते बनावट आहे. अशा व्यक्तीला मी ओळखत नाही अथवा माझा परिचय नाही. या प्रकाराची संपूर्ण चौकशी करणार आहे. त्या चौकशीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या त्या वेळच्या सगळ्या आमदारांना अपात्र करा; सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

मराठवाड्यात दाटले दुष्काळाचे ढग; ११ मोठ्या धरणांमध्ये ६९ टक्के पाणीसाठा

Mumbai : तीन वर्षांत एसी लोकलची तयारी; आयसीएफ १२०, आरसीएफ ७१, एमसीएफ ४७ रेक तयार करणार

व्यावहारिक मराठी येत नसलेल्या ६६४ चालकांना नोटिसा; ३० सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम, ३,९९५ वाहनचालकांची तपासणी

मेट्रो १० च्या खर्चात ७१६ कोटींची वाढ; साडेपाच किमी रस्त्याच्या रुंदीकरणाचाही समावेश