उपमहापौरांच्या बंगल्यासाठी प्रयत्न करणार; आयुक्तांना शिफारस करणार - महापौर  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

उपमहापौरांच्या बंगल्यासाठी प्रयत्न करणार; आयुक्तांना शिफारस करणार - महापौर

उपमहापौर संजय घाडी यांना भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात अतिरिक्त आयुक्त यांचा बंगला देणे गैर नाही. मुंबई महापालिकेच्या जल विभागाचे चार पाच बंगले तयार असून आयुक्तांना घाडी यांना बंगला देण्याबाबत शिफारस करणार असल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : उपमहापौर संजय घाडी यांना भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात अतिरिक्त आयुक्त यांचा बंगला देणे गैर नाही. मुंबई महापालिकेच्या जल विभागाचे चार पाच बंगले तयार असून आयुक्तांना घाडी यांना बंगला देण्याबाबत शिफारस करणार असल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.

उपमहापौर यांना वैधानिक दर्जा नसतानाही महापौरांनी केलेल्या शिफारसमुळे वैधानिक दर्जा असलेले सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, स्थायी, सुधार व शिक्षण समिती अध्यक्ष आश्चर्य चकित झाले आहेत.

महापौरांप्रमाणे आपल्यालाही राणीबागेमध्ये बंगला मिळावा, अशी मागणी उपमहापौर संजय घाडी यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र पाठवून केली होती. याची प्रशासनाने दखल घेतली नसली तरी, महापौर रितू तावडे यांनी मात्र दखल घेतली आहे. सभागृहात महापौर उपस्थित नसताना उपमहापौर सभा चालवतात. त्यामुळे त्यांना महापालिकेतर्फे निवासस्थान मिळायला हवे.

मुंबई महापौरांना वैधानिक दर्जा असून त्यांना एक विशेष महत्त्व आहे. पालिकेच्या अधिनियमात उपमहापौर या पदाला मंजुरी आहे. पण त्याला वैधानिक दर्जा नाही. त्यामुळे त्यांना महापौरांप्रमाणे महागडी गाडी, दालन, सुरक्षारक्षक, बंगला, सेवेसाठी कर्मचारी देणे शक्य नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग