मेट्रो ४ दुर्घटना : आणखी दोघांना जामीन संग्रहित छायाचित्र
मुंबई

मेट्रो ४ दुर्घटना : आणखी दोन आरोपींना जामीन मंजूर

मुलुंड येथील मेट्रो मार्गिका ४ च्या कामादरम्यान झालेल्या जीवघेण्या पॅरापेट दुर्घटनेप्रकरणी सत्र न्यायालयाने सोमवारी आणखी दोन आरोपींना जामीन मंजूर केला.

Swapnil S

मुंबई : मुलुंड येथील मेट्रो मार्गिका ४ च्या कामादरम्यान झालेल्या जीवघेण्या पॅरापेट दुर्घटनेप्रकरणी सत्र न्यायालयाने सोमवारी आणखी दोन आरोपींना जामीन मंजूर केला.

१४ फेब्रुवारी रोजी काँक्रीटचा एक मोठा भाग चालत्या वाहनांवर कोसळून झालेल्या या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर तीन जण जखमी झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी सदोष मनुष्यवध, मालमत्तेचे नुकसान आणि समान हेतूने केलेले कृत्य या आरोपांखाली भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात जामीन मिळालेल्या दोन आरोपींमध्ये उपव्यवस्थापक सौरभ सिंह आणि सुपरवायझर प्रशांत भोईर यांचा समावेश आहे. न्यायालयाने यापूर्वीच मागील आठवड्यात डीबी हिल एसबीजी कंपनीचे प्रकल्प संचालक हरीश चौहान, प्रकल्प व्यवस्थापक कुलदीप सपकाळ आणि अवधूत इनामदार या तिघांना जामीन मंजूर केला होता. या दोघांबाबतच्या सविस्तर आदेशाची प्रत अद्याप उपलब्ध झालेली नाही.

गेल्या आठवड्यात तिघांना जामीन देताना न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले होते की, ही दुर्घटना वेल्डरच्या चुकीमुळे घडली आहे. हा अपघात अचानक घडला असून वेल्डरने त्याच्या वरिष्ठांच्या सूचनांचे पालन न केल्याने ही घटना घडल्याचे न्यायालयाने नमूद केले होते.

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर! दिवाळीनंतर कसारा मार्गावर १५ डब्यांच्या लोकल वाढणार

MLC Election 2026 : शिक्षक, ‘पदवीधर’साठी आज मतदान; मतदानासाठी यंत्रणा सज्ज; पाच जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात

CJP चे आज देशव्यापी आंदोलन; दीपके, राकेश टिकैतसह परकला सीतारामन, प्रकाश राज यांची उपस्थिती

मतवारी दुष्काळाची! छतावरचं पाणी, घरासमोरची टाकी; ब्राझीलची दहा लाख टाक्यांची चळवळ

नांदेड : दसरा गेला अंधारात, आता दिवाळीचं काय? फुले अक्षरशः फेकली रस्त्यावर; शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघाला नाही